नवी दिल्ली India vs Pakistan : आशिया कपमध्ये भारताने ४९ एकदिवसीय सामने खेळले असून त्यातील ३१ सामन्यांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे. आशिया कप खेळणाऱ्या संघांवर जर आपण नजर टाकल्यास श्रीलंकेनं भारतापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्यातील ३४ सामन्यात श्रीलंकेनं विजय मिळवला आहे. आशिया कपमध्ये श्रीलंकेनं एकूण ५० सामने खेळले आहेत. तर पाकिस्ताननं ४५ सामने खेळले असून केवळ ३६ सामने जिंकले आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारतानं एकूण १७ वेळा पाकिस्तानचा सामना केला आहे. ज्यामध्ये भारतानं १७ सामने खेळले आहेत. त्यातील ९ सामन्यात भारतानं विजय देखील मिळवला आहे. मात्र, पाकिस्तानला केवळ ६ सामने जिंकण्यात यश आलं आहे.
-
A wonderful match is going to be happen Tomorrow. Let's see the details over here.
— SportyTreasury (@AtulM99) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
👇👇👇👇https://t.co/4iVc0aVdhJ
.
.#INDvsPAK #IndiaVsPakistan #India Vs #Pakistan#AsiaCup2023 #ShoaibAkhtar #SachinTendulkar#BCCI #PCB #IndianCricketTeam pic.twitter.com/RtoyZIWYF9
">A wonderful match is going to be happen Tomorrow. Let's see the details over here.
— SportyTreasury (@AtulM99) September 1, 2023
👇👇👇👇https://t.co/4iVc0aVdhJ
.
.#INDvsPAK #IndiaVsPakistan #India Vs #Pakistan#AsiaCup2023 #ShoaibAkhtar #SachinTendulkar#BCCI #PCB #IndianCricketTeam pic.twitter.com/RtoyZIWYF9A wonderful match is going to be happen Tomorrow. Let's see the details over here.
— SportyTreasury (@AtulM99) September 1, 2023
👇👇👇👇https://t.co/4iVc0aVdhJ
.
.#INDvsPAK #IndiaVsPakistan #India Vs #Pakistan#AsiaCup2023 #ShoaibAkhtar #SachinTendulkar#BCCI #PCB #IndianCricketTeam pic.twitter.com/RtoyZIWYF9
पाकिस्तान भारतापेक्षा वरचढ : भारत, पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाची (Asia Cup 2023) आकडेवारी भारतीय संघाच्या बाजूनं आहे. मात्र, दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांचे निकाल पाहता, पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा वरचढ असल्याचं दिसतंय. दोन्ही देशांमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघानं चांगली कामगिरी केल्यानं तो भारतीय संघापेक्षा एक पाऊल पुढं दिसतोय. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत एकूण १३२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पाकिस्ताननं ७३ तर भारतीय संघानं केवळ ५५ सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाचा केवळ 55 समान्यात विजय : भारत-पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलायचं तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पाकिस्ताननं ७३ सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघ केवळ ५५ सामन्यावर विजय मिळवण्यात यशस्वी झालाय. तसंच ४ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. भारत, पाकिस्तान यांच्यातील घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतानं पाकिस्तानविरुद्ध केवळ ११ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्ताननं १४ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, घरच्या मैदानाबाहेर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये पाकिस्ताननं १९ सामने जिंकले, तर टीम इंडियाला केवळ ११ सामने जिंकण्यात यश आलं.
-
If you remember this moment from India vs Pakistan match then you know Rohit Sharma is awesome. pic.twitter.com/R26rB33uCP
— R A T N I S H (@LoyalSachinFan) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">If you remember this moment from India vs Pakistan match then you know Rohit Sharma is awesome. pic.twitter.com/R26rB33uCP
— R A T N I S H (@LoyalSachinFan) September 1, 2023If you remember this moment from India vs Pakistan match then you know Rohit Sharma is awesome. pic.twitter.com/R26rB33uCP
— R A T N I S H (@LoyalSachinFan) September 1, 2023
भारतानं ७ विजेतेपदे जिंकली : आशिया चषकाच्या एकदिवसीय फॉर्मॅटमध्ये आयोजित १३ पैकी १२ स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारतानं आपलं कौशल्य दाखवलं आहे. १९८६ मध्ये श्रीलंकेत झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारतानं सहभागी होण्यास नकार दिला होता. याशिवाय, १५ आशिया चषक स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर, भारतानं ७ विजेतेपदे जिंकली आहेत. ज्यात ६ एकदिवसीय सामन्यांसह एका टी-२० सामन्याचा समावेश आहे.
हेही वाचा -
- Asia Cup 2023 : आशिया चषकात रोहित शर्माच्या नावे 'हा' अनोखा रेकॉर्ड, धोनी-रणतुंगा सारख्या दिग्गजांनाही मागं टाकलं!
- Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्रानं झुरिच डायमंड लीग स्पर्धेत पटकावलं दुसरं स्थान, फायनलसाठी पात्र
- Kashinath Naik On Neeraj Chopra : नीरज चोप्राला खरंच प्रशिक्षण दिल होतं का? माजी प्रशिक्षकानं दिल सणसणीत उत्तर