ETV Bharat / bharat

चांगली बातमी! नव्या 67 हजार 208 रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट वाढून 95.93 टक्क्यांवर

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 67 हजार 208 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,03,570 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 2,330 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 17, 2021, 9:41 AM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट असून दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 67 हजार 208 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,03,570 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 2,330 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.

देशात आतापर्यंत एकूण 2 कोटी 84 लाखांहून अधिक नागरिक आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात आता 8 लाख 26 हजार 740 नागरिकांवर उपचार सुरू आहे. तसेच देशात विक्रमी कोरोना चाचण्या होत आहेत. बुधवारी 19,31,249 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 38,52,38,220 चाचण्या पार पडल्या आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...

  • एकूण रुग्ण : 2,97,00,313
  • कोरोनामुक्त रुग्ण : 2,84,91,670
  • एकूण मृत्यू : 3,81,903
  • सक्रीय रुग्ण संख्या : 8,26,740
  • एकूण लसीकरण : 26,55,19,251

कोरोनाचा 'डेल्टा प्लस' स्ट्रेन घातक -

कोरोना विषाणू हा वारंवार आपले रुप बदलताना दिसून येत आहे. आधी आफ्रिका, मग लंडन आणि अशाच काही देशांनंतर भारतातही या विषाणूचे नवे स्ट्रेन दिसून आले आहेत. भारतातील या स्ट्रेन्सना डेल्टा आणि काप्पा अशी नावं देण्यात आली होती. यामधील डेल्टा स्ट्रेनचा 'डेल्टा प्लस' हा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा या व्हेरिएंटवर कितपत परिणाम होतो याबाबतही साशंकता असल्याचे डॉ. शीतल वर्मा यांनी म्हटले आहे. त्या केजीएमयूमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.