नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 53 हजार 480 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 21 लाख 49 हजार 335 वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.
तसेच, देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 354 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, देशातील एकूण अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ५२ हजार ५६६वर पोहोचली आहे. सध्या कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 94.11 टक्क्यांवर आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
कोरोना रुग्णांची आकडेवारी..
सात ऑगस्टला देशातील कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांवर पोहोचली होती. त्यानंतर ३० लाखांचा टप्पा गाठण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंतचा कालावधी लागला. पुढे ५ सप्टेंबरला ४० लाख, तर १६ सप्टेंबरला ५० लाख रुग्णांचा टप्पा गाठला. २८ सप्टेंबरला ६० लाख, ११ ऑक्टोबरला ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाख, २० नोव्हेंबरला ९० लाख तर १९ डिसेंबरला एक कोटी रुग्णांचा टप्पा गाठला होता.
दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण २४ कोटी ३६ लाख ७२ हजार ९४० नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
हेही वाचा : मराठवाड्यात कोरोनाचा हाहाकार! चोवीस तासात 84 मृत्यू