मुंबई - कोरोना रुग्णांची वाढ होत आहेच. (India Corona Update) ती आजही कायम आहे. आज भारतात गेल्या 24 तासांत 3,33,533 (New Corona cases In India)नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेने ही आकडेवारी कमी आहे. (कालच्या तुलनेत 4,171 कमी), यामध्ये 525 मृत्यू रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (New corona patients in India) तर 2,59,168 कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, सध्या 21,87,205 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.
साप्ताहिक कोरोनाबाधितांचा दर वाढला
भारतात कोरोनाबाधितांचा रोजचा दर आणि साप्ताहिक दर अनुक्रमे 17.78 टक्के आणि 16.87 टक्के इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 93.18 टक्के इतका आहे. रोजची रुग्णवाढ शनिवारच्या 3.37 लाख प्रकरणांपेक्षा कमी आहे. दरम्यान, दैनिक आणि साप्ताहिक कोरोनाबाधितांचा दर वाढला आहे.
केरळमध्ये कोरोना रुग्ण वाढले
सध्या देशात केरळमध्ये कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ नोंदवण्यात येत आहे. शनिवारी (दि. 22 जानेवारी) 45,136 नवीन पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आणि त्यांची संख्या 55,74,702 झाली. आरोग्य विभागाने सांगितले की, राज्याने गेल्या 24 तासांत 1,00735 नमुन्यांची चाचणी केली आहे. आणि केरळमध्ये 2,47,227 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.