ETV Bharat / bharat

...तर चालू वर्षात डिसेंबर अखेर 18 वर्षांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण होईल- इंडियन मेडिकल असोसिएशन - आयएमएम अध्यक्ष लसीकरण प्रतिक्रिया

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची कमतरता असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

1 crore vaccine doses
1 crore vaccine doses
author img

By

Published : Aug 28, 2021, 3:17 PM IST

नवी दिल्ली - एका दिवसात 1 कोटी नागरिकांना कोरोनाची लस शुक्रवारी देण्यात आल्यानंतर देशातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते डिसेंबर अखेर 18 वर्षावरील लोकांचे लसीकरण पूर्ण होऊ शकते.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की लसीकरणातील यशाने देशाच्या आरोग्याची पायाभूत सुविधा आणि मानव संसाधन विकसित झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना महामारीने भारताच्या आरोग्य पायाभूत सुविधा व मनुष्यबळाचे संकट दाखवून दिले. मात्र, कालच्या विक्रमी लसीकरणाने परिस्थिती सुधारल्याचे दाखवून दिले.

हेही वाचा-सप्टेंबरमध्ये 'या' 12 दिवशी बँका राहणार बंद, पहा वेळापत्रक

लसीकरण वाढविण्यात खासगी रुग्णालयांचा महत्त्वपूर्ण सहभाग

डॉ. जयलाल म्हणाले, लसीकरण वाढविण्यात खासगी रुग्णालयेदेखील पूर्णपणे सहभागी आहेत. प्रत्यक्षात लोकांनाही लसीकरणाचे महत्त्व समजू लागले आहे. खासगी रुग्णालयांना देण्यात येणारा लशींचा 25 टक्के साठा हा प्रभावीपणे वापरण्यात आला आहे. सरकारने लशींची उपलब्धता, चांगल्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ही सुविधा उपलब्ध झाल्या तर निश्चितच चालू वर्षात डिसेंबर अखेर 18 वर्षांहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. जयकर यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची कमतरता असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण आहे.

हेही वाचा-Mysuru gang-rape : पीडित तरुणी आपल्या घरी मुंबईला परतली; पाच संशयितांना अटक

लसीकरणात उत्तर प्रदेशचा पहिला तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

आरोग्य मंत्रालयाकडील लसीकरणाची आकडेवारी ईटीव्ही भारतला मिळाली आहे. या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही राज्ये लसीकरणात आघाडीवर आहेत. भारतात शुक्रवारी 1,00,63,931 कोरोना लशींचे डोस देण्यात आले आहेत. सर्वाधिक लसीकरण झालेल्या उत्तर प्रदेशात लशींचे 2862649 डोस देण्यात आले आहेत. तर कर्नाटकमध्ये 1079588 लशींचे डोस देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात कोरोना लशींचे 984117 डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा-काबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटातून दिसले अमेरिकेसह तालिबानच्या सुरक्षा दलाचे अपयश

असे आहे इतर राज्यांमधील लसीकरण-

  • आंध्र प्रदेश - 3,24577
  • बिहार - 4,98272
  • गुजरात - 4,89492
  • हरियाणा- 6,00,220
  • केरळ- 4,84,130
  • ओडिशा- 2,67,960
  • राजस्थान- 4,59,915
  • तामिळनाडू - 3,73,655
  • पश्चिम बंगाल - 5,47,015

दरम्यान, कोरोना लसीकरण मोहिमेत एकूण 62.29 कोटी नागरिकांना कोरोना लशींचे डोस देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.