हैदराबाद - देशामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. गेल्या 24 तासांमध्ये नवीन 41,649 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर मृत्युंची संख्या 593 आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजता दिली आहे.
देशातील कोरोनाबाधितांचे आजपर्यंतचे एकूण प्रमाण 3,07,81,263 वर पोहोचले आहे. देशात कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात 46,15,18,479 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार 30 जुलै अखेर एकूण 46,64,27,038 नमुने कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर शुक्रवारी 17,76,315 कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.
हेही वाचा-जम्मू काश्मीर : पुलवामाच्या हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी एन्काउन्टरमध्ये ठार
रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.37 टक्के
रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.37 टक्के आहे. तर 24 तासांमध्ये 37,291 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशामध्ये आठवड्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर हा 5 टक्क्यांहून कमी आहे. सध्या पॉझिटिव्हिटीचा दर हा 2.42 टक्के आहे. दर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 2.34 टक्के आहे. हा दर 5 टक्क्यांहून कमी राहिलेला आहे.
दरम्यान, देशातील 10 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत वाढलेले आहे.
हेही वाचा-रुग्णालयाचा बेजबाबदारपणा, अर्धांगवायूने त्रासलेल्या रुग्णाच्या चेहऱ्याला लागल्या मुंग्या
राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. राज्यात या महिन्यात 1, 6 आणि 18 जुलैला कोरोना विषाणुच्या सर्वाधिक 9 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. या महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळला आहे. शुक्रवारी राज्यात 6,600 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 मृत्यूंची नोंद झाली आहे.