किव्ह - युक्रेनच्या बुचा येथे झालेल्या नागरी हत्येनंतर जगभरात हादरून गेलेल्या आणि भयभीत झालेल्या युक्रेनच्या बुका येथील नागरिकांच्या हत्येनंतर रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्यात आले. यावेळी मसुद्याच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मतदान झाले. त्यावेळी भारताने आपल्या कठोर भूमीकेवर तटस्थ राहत मतदान करण्याचे टाळले आहे. ( Russia's suspension from the Human Rights Council ) दरम्यान, रशियाचे निलंबण काण्याच्या बाजूने 93 राष्ट्रांनी मतदान केले, 24 राष्ट्रांनी रशियाच्या बाजूने मतदान केले. तर, भारतासह 58 राष्ट्र गैरहजर होते.
-
UN General Assembly suspends Russia from Human Rights Council
— ANI (@ANI) April 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
93 countries voted in favour of the draft resolution, 24 countries voted against it, 58 countries abstained pic.twitter.com/Glt34LrFOm
">UN General Assembly suspends Russia from Human Rights Council
— ANI (@ANI) April 7, 2022
93 countries voted in favour of the draft resolution, 24 countries voted against it, 58 countries abstained pic.twitter.com/Glt34LrFOmUN General Assembly suspends Russia from Human Rights Council
— ANI (@ANI) April 7, 2022
93 countries voted in favour of the draft resolution, 24 countries voted against it, 58 countries abstained pic.twitter.com/Glt34LrFOm
भारतासह 58 देशांनी मतदानात भाग घेतला नाही - युक्रेनवर रशियाने वारंवार हल्ले चालूच ठेवले असल्यामुळे अमेरिकेकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. या भागात, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून रशियाला निलंबित करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) मतदान घेतले. त्यामध्ये रशियाला (UNHRC) मधून निलंबित करण्यात आले आहे. (India Abstained From UN Vote To Remove Russia ) रशियाला वगळण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने 93 मते पडली. भारतासह 58 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. तर 24 देशांनी रशियाच्या बाजूने मतदान केले.
गोळ्या घालून खंदकात फेकले गेले - खरं तर, युक्रेनमधील 410 नागरिकांचे मृतदेह राजधानी कीवच्या आसपासच्या शहरांमध्ये सापडले होते, जे अलीकडच्या काही दिवसांत रशियन सैन्याने पुन्हा ताब्यात घेतले होते. यामध्ये नऊ पुरुषांच्या गटाचे मृतदेह आढळून आले. (India Abstained From UN Vote ) हे सर्व नागरी कपड्यांमध्ये होते. दरम्यान, ते सैनिकांचा छावणी भागात असल्याचे रहिवाशांनी सांगितले आहे. यांना जवळून गोळ्या घातल्या गेल्याचे दिसत होते. तसेच, त्यांच्यापैकी दोन जणांचे हात पाठीमागे बांधल्याचेही दिसून आले. तर, कीवच्या पश्चिमेकडील मोतीझिनमध्ये, एपीच्या पत्रकारांनी चार लोकांचे मृतदेह पाहिले ज्यांना जवळून गोळ्या घालून खंदकात फेकले गेले होते.
हे लोक इस्लामिक स्टेट गटासारखे - पाश्चात्य आणि युक्रेनियन नेत्यांनी भूतकाळात रशियावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातील वकीलांनी युद्धाचा तपास सुरू केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि काही पाश्चिमात्य नेते आता रशियावर नरसंहाराचा आरोप करत आहेत. (India Abstained From UN Vote To Remove Russia ) दरम्यान, या युद्धात युक्रेन सैन्यांवर (UNSC) रशियन सैनिकांनी दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात क्रूर अत्याचार केल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे. तसेच, ते म्हणाले, की हे लोक इस्लामिक स्टेट गटासारख्या दहशतवाद्यांपेक्षा वेगळे नाहीत.
अलीकडे आलेले अहवाल अतिशय अस्वस्थ करणारे - युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, रशियन सैनिकांनी युक्रेनच्या नागरिकांचे हात पाय कापले, त्यांचे गळे कापले. मुलांसमोर महिलांवर बलात्कार, हत्या करण्यात आल्या. (Russia's suspension from the Human Rights Council) त्यांची जीभ ओढली गेली, कारण युक्रेन त्यांच्यासमोर झुकला नाही. युक्रेनने त्यांचे काही ऐकले नाही. झेलेन्स्कीने यांनी याला दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात वाईट घटना असल्याचे म्हटले आहे. युनायटेड नेशन्समधील भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनीही युक्रेनवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले, की बुचा येथील नागरिकांच्या मृत्यूचे अलीकडे आलेले अहवाल अतिशय अस्वस्थ करणारे आहेत.
हेही वाचा - ऑनलाइन सुनावणीवेळी वकीलाचे महिलेशी असभ्य वर्तन, न्यायलयाचे दिले भरपाईचे आदेश