नवी दिल्ली - दुसरी लाट ओसरत असल्याचं कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. आज देशात 53,256 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 88 दिवसातील सर्वांत कमी रुग्ण संख्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तर 1422 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला. रिकव्हरी रेट वाढून 96.36 टक्क्यांवर पोहचला आहे. तर 78,190 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
देशात आतापर्यंत एकूण 2 कोटी 88 लाखांहून अधिक नागरिक आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात आता 7 लाख 2 हजार 887 नागरिकांवर उपचार सुरू आहे. तसेच देशात विक्रमी कोरोना चाचण्या होत आहेत. रविवारी 13,88,699 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण 39,24,07,782 चाचण्या पार पडल्या आहेत.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- एकूण रुग्ण : 2,99,35,221
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 2,88,44,199
- एकूण मृत्यू : 3,88,135
- सक्रिय रुग्ण संख्या : 7,02,887
- एकूण लसीकरण : 28,00,36,898
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी -
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. रविवारी राज्यात नव्या 9361 कोरोना रुग्णांची भर पडली असून 190 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 9101 जणांना रुग्णालयातून डिस्रार्च देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 1,32,241 सक्रिय रुग्ण असून 57,19,457 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.76 टक्के एवढा आहे.
आजपासून मोफत लसीकरण...
केंद्र सरकारने सोमवार, 21 जूनपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात आज, 21 जूनपासून होणार आहे. राज्यांना पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध व्हावा, याकडे सरकारचे लक्ष आहे.केंद्र सरकार लसउत्पादकांकडून उपलब्ध लसमात्रांपैकी 75 टक्के मात्रा खरेदी करून त्यांचा राज्यांना पुरवठा करणार आहे.
हेही वाचा - #MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..