ETV Bharat / bharat

रविवारी 1 लाख 65 हजार नवीन संक्रमितांची नोंद, तर 3 हजार 460 मृत्यू - देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

रविवारी देशभरात 2 लाखापेक्षी कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 65 हजार 553 रुग्ण आढळले आहेत. तर आजही मृतांचा आकडा चिंताजनक आहे. 3 हजार 460 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 12 एप्रिलनंतर चौथ्यांदा देशात दोन लाखापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. हे दिलासादायक आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : May 30, 2021, 7:26 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत कमी होताना दिसत आहे. रविवारी देशभरात 2 लाखापेक्षी कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 65 हजार 553 रुग्ण आढळले आहेत. तर आजही मृतांचा आकडा चिंताजनक आहे. 3 हजार 460 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 12 एप्रिलनंतर चौथ्यांदा देशात दोन लाखापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. हे दिलासादायक आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

  • गेल्या 24 तासातील नवे रुग्ण - 1,65,553
  • गेल्या 24 तासात डिस्चार्ज दिलेले रुग्ण - 2,76,309
  • गेल्या 24 तासांतील मृत्यू – 3,460
  • एकूण रूग्ण - 2,78,94,800
  • एकूण डिस्चार्ज – 2,54,54,320
  • एकूण मृत्यू – 3,25,972
  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 21,14,508
  • गेल्या 24 तासातील लसीकरण संख्या - 30,35,749
  • आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या - 21,20,66,614
  • गेल्या 24 तासात झालेल्या चाचण्या - 20,63,839
  • एकूण चाचण्यांची आकडेवारी - 34,31,83,748

कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक?

कोरोनाची तिसरी लाट ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात होते. यावर एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक नसल्याचे सांगितले. देशात आतापर्यंत कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट पसरली. या दोन्ही लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यामुळे तीसऱ्या लाटेतही मुलांना कोरोनाची बाधा होईल, असे वाटत नाही. तसेच यासंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत, असे रणदीप गुलेरिया म्हणाले.

भारतातच पसरतोय 'ब्लॅक फंगस' -

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचाही मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसून येत आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, आणि स्टेरॉईडचा वापर हे या आजाराची लागण होण्याचे कारण मानले जात आहे. डॉक्टर याबाबत विविध प्रकारच्या थिअरी मांडत आहेत. मात्र, ज्याप्रमाणे भारतात हा आजार दिसून येत आहे, त्याप्रमाणे जगातील इतर कोणत्याही देशात ब्लॅक फंगसचा प्रसार झालेला पहायला मिळत नाहीये. ब्लॅक फंगसचे जेवढे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश रुग्णांना कोरोना होऊन गेला होता, किंवा मधुमेहाची लागण झाली होती. तज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः औषधे घेणेही ब्लॅक फंगस होण्याचे कारण ठरू शकते. तसेच, अस्वच्छ मास्कचा वारंवार केलेला वापर, औद्योगिक ऑक्सिजनचा वापर अशा कारणांमुळेही ब्लॅक आणि व्हाईट फंगसची लागण होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.