मुंबई : भारतामध्ये सोमवारी 16,135 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, जे रविवारी नोंदवलेल्या 16,103 संसर्ग आणि 24 मृत्यूंपेक्षा किंचित जास्त आहेत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार. सक्रिय प्रकरणे आता 1,13,864 आहेत आणि आजपर्यंत देशभरात 5,25,223 मृत्यूची नोंद झाली आहे. तब्बल 4,28,79,477 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार दिल्लीत रविवारी 648 नवीन कोविड -19 प्रकरणे आणि 5 संबंधित मृत्यूची नोंद झाली. सकारात्मकता दर 4.29 टक्के आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत 761 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले काही दिवस २ हजारांवर रुग्ण आढळून आले. त्यानंतर चाचण्यांची संख्या कमी केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज ( 4 जुलै ) सलग चौथ्या दिवशी एक हजारच्या खाली रुग्णसंख्या नोंद झाली आहे. आज ४३१ रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Sees 431 Corona Cases ) आहे. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ४४५ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
४.७६ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासांत ९ हजार ५२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४३१ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ४.७६ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. २ मृत्यूची नोंद झाली आहे. १०६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १५ हजार ४७३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ८८ हजार ८१४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार ४० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६८६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०९७ टक्के इतका आहे.
२२ रुग्ण व्हेंटिलेटरवर - मुंबईत आज आढळून आलेल्या ४३१ रुग्णांपैकी ३७७ म्हणजेच ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८३१ बेड्स असून त्यापैकी ४४५ बेडवर रुग्ण आहेत. ४९ रुग्ण ऑक्सिजनवर, ९३ रुग्ण आयसीयूमध्ये तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
हेही वाचा - COVID19: भारतात गेल्या 24 तासात 16,135 नवीन कोरोना रुग्ण, 24 जणांचा मृत्यू