नवी दिल्ली India Canada Row : कॅनडातील खलिस्तानी फुटीरतावाद्यांच्या हत्येबद्दल कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्थ नसल्याचं भारतानं गुरुवारी सांगितलं. जस्टिन ट्रूडो यांनी केलेले आरोप "राजकीयदृष्ट्या प्रेरित" असल्याचंही भारतानं म्हटलंय. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, कॅनडानं हरदीप सिंग निज्जर प्रकरणावर भारतासोबत कोणतीही विशिष्ट माहिती शेअर केलेली नाही. जूनमध्ये निज्जरच्या हत्येवरून भारत, कॅनडात राजनैतिक वाद सुरूच होता. फुटीरतावादी नेत्याच्या हत्येमध्ये भारतीय दलालांचा सहभाग असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले आहेत.
-
WATCH | "The issue is not about travel to India. Those who have valid visas, OCIs are free to travel to India. The issue is the incitement of violence, inaction by Canadian authorities and the creation of an environment that disrupts the functioning of our consulates which is… pic.twitter.com/fN2cvz6z6V
— ANI (@ANI) September 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">WATCH | "The issue is not about travel to India. Those who have valid visas, OCIs are free to travel to India. The issue is the incitement of violence, inaction by Canadian authorities and the creation of an environment that disrupts the functioning of our consulates which is… pic.twitter.com/fN2cvz6z6V
— ANI (@ANI) September 21, 2023WATCH | "The issue is not about travel to India. Those who have valid visas, OCIs are free to travel to India. The issue is the incitement of violence, inaction by Canadian authorities and the creation of an environment that disrupts the functioning of our consulates which is… pic.twitter.com/fN2cvz6z6V
— ANI (@ANI) September 21, 2023
भारत व्हिसा प्रक्रिया करण्यास अक्षम : कॅनडासोबतच्या राजनैतिक वादावर सरकारनं आपली भूमिका प्रमुख सहयोगी देशांना कळवली आहे का, असं विचारलं असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारतानं आपली भूमिका सर्वांसमोर ठेवली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यांमुळं कॅनडातील भारतीय उच्चायुक्त, वाणिज्य दूतावास व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्यास तात्पुरतं अक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलं.
-
#WATCH | On allegations by Canada, MEA Spokesperson Arindam Bagchi says, "Yes these allegations were raised by Canadian PM Justin Trudeau with PM (Modi) and PM rejected them." pic.twitter.com/FDxZ1Rc8aw
— ANI (@ANI) September 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | On allegations by Canada, MEA Spokesperson Arindam Bagchi says, "Yes these allegations were raised by Canadian PM Justin Trudeau with PM (Modi) and PM rejected them." pic.twitter.com/FDxZ1Rc8aw
— ANI (@ANI) September 21, 2023#WATCH | On allegations by Canada, MEA Spokesperson Arindam Bagchi says, "Yes these allegations were raised by Canadian PM Justin Trudeau with PM (Modi) and PM rejected them." pic.twitter.com/FDxZ1Rc8aw
— ANI (@ANI) September 21, 2023
कॅनडासाठी व्हिसा सेवा स्थगित : तत्पूर्वी, भारतानं कॅनडासाठी व्हिसा सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी जूनमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा सहभाग असल्याच्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडत असताना हे पाऊल उचलण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतानं कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
-
#WATCH | MEA Spokesperson Arindam Bagchi says, "If you're talking about reputational issues and reputational damage, if there's any country that needs to look at this, I think it is Canada and its growing reputation as a place, as a safe haven for terrorists, for extremists, and… pic.twitter.com/F2LZGTJ6b9
— ANI (@ANI) September 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | MEA Spokesperson Arindam Bagchi says, "If you're talking about reputational issues and reputational damage, if there's any country that needs to look at this, I think it is Canada and its growing reputation as a place, as a safe haven for terrorists, for extremists, and… pic.twitter.com/F2LZGTJ6b9
— ANI (@ANI) September 21, 2023#WATCH | MEA Spokesperson Arindam Bagchi says, "If you're talking about reputational issues and reputational damage, if there's any country that needs to look at this, I think it is Canada and its growing reputation as a place, as a safe haven for terrorists, for extremists, and… pic.twitter.com/F2LZGTJ6b9
— ANI (@ANI) September 21, 2023
राजदूताला देश सोडण्याचे आदेश : कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा अर्जांची प्राथमिक तपासणी करणार्या एका खासगी एजन्सीनं त्यांच्या वेबसाइटवर नोटीस जारी केली आहे. भारतीय व्हिसा सेवा "पुढील सूचना मिळेपर्यंत" स्थगित करण्यात आली आहे. भारतानं मंगळवारी कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते. कॅनडाच्या राजदूताला या प्रकरणी पाच दिवसात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
कॅनडात भारतविरोधी कारवाया : कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया, राजकीयदृष्ट्या समर्थित द्वेषपूर्ण गुन्हेगारी, हिंसाचार लक्षात घेऊन तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं अवाहन भारत सरकारनं केलं होतं, तसंच कॅनडातील काही भागात भारतीय नागरिकांनी प्रवास टाळावा असं भारत सरकारनं स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा -