हैद्राबाद India Canada Relations : 'भारतीय एजंट'वर कॅनडात एका खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्याला ठार मारल्याचा आरोप कॅनडानं केला आहे. यानंतर भारत, कॅनडामध्ये राजनैतिक तणाव वाढल्याचं दिसून येत आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर, भारत-कॅनडा संबंधांकडं पाहताना देशातील शेतकरी तसंच कृषी उत्पादनांच्या दृष्टीकोनातून पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. भारत, कॅनडामधील संबंध तातडीनं सुधारले नाहीत तर भारताच्या अन्न अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतावर केले गंभीर आरोप : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्याच्या कथित हत्येबद्दल संसद, तसंच कॅनेडीयन माध्यमांसमोर भारत सरकारकडं बोट दाखवलं आहे. त्यामुळं दोन्ही देशातील व्हिसासह व्यापार निर्बंध हे त्यावर राजनैतिक उपाय करण्यात येत आहेत. यामध्ये शुल्क, व्यापार निर्बंध, राजदूतांना परत बोलावणं यासारख्या घटनांचा समावेश आहे. पण तुम्ही म्हणाल याचा शेतीशी काय संबंध? मात्र, याचा शेतीशी खोलवर संबंध आहे.
खतांच्या किमती वाढल्या : रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून खतांच्या किमती वाढल्या आहेत. अलीकडे DAP च्या किमती 25% ने वाढल्या आहेत. NPK खताच्या किमती देखील वाढल्या आहेत. इथंच कॅनडा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. कॅनडामध्ये पोटॅशचा जगातील सर्वात मोठा साठा आहे. औद्योगिक, शेतीसाठी एमओपी खताच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे खनिज आहे. 30% पेक्षा जास्त जागतिक पोटॅशसाठा तसंच पोटॅशचा सर्वोच्च उत्पादक देश म्हणून कॅनडा गेल्या वर्षी प्रथम MOP क्रमांकाचा पुरवठादार देश होता.
खतांचा पुरवठा खंडित : युक्रेन रशिया संघर्षामुळं खतांचा पुरवठा खंडित झाला आहे. ज्यामुळं भारताकडं मर्यादित पोटॅश खतं आहेत. चीन, कॅनडा हे दोन्ही प्रमुख पोटॅश उत्पादक देश भारताच्या कृषी परिस्थितीचं बारकाईनं निरीक्षण करतायत. संबंध बिघडत असताना, कॅनडा भारताकडून सवलतींची मागणी करून याचा फायदा घेऊ शकतो, कदाचित कॅनडाच्या पोटॅश निर्यातीवर संपूर्ण बंदी घालण्यासाठी भारतावर दबाव आणू शकतो. अशा हालचालीमुळं भारताच्या अन्नसुरक्षेवर, पिकांवर घातक परिणाम होऊ शकतो.
रब्बी पेरणीसह गहू पिकावर लक्षणीय परिणाम : कॅनडा ऐतिहासिकदृष्ट्या पोटॅशचा एक विश्वासार्ह स्रोत आहे. खताचा हा धोका ओळखून भारतानं कॅनडाला पोटॅशचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्याचं आवाहन केलंय. जोपर्यंत भारत, रशिया बेलारूसमधून शिपमेंट वाढवण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आम्हाला कृषी संबंधित संसाधनाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळं रब्बी पेरणीसह गहू पिकावर लक्षणीय परिणाम होईल.
कॅनडातून भारताला 59% डाळींचा पुरवठा : कॅनडा हा भारताला कडधान्य, तेलबिया, कॅनोला तेल, फीड ऑइल यासह मौल्यवान कृषी वस्तूंचा फार पूर्वीपासून पुरवठा करतोय. सुमारे 95% डाळी, विशेषतः मसूर, कॅनडातून भारतात येतात. अलिकडच्या वर्षांत, कॅनडा हा भारतात लाल मसूराचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश ठरला आहे. ज्यामुळं डाळीच्या किमती स्थिर राहण्यास मदत होतेय.
भारतीय शेतीसमोरील आव्हानं : देशात विशेषत: डाळी, तेलबियांच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे. देशांतर्गत डाळींच्या पुरवठ्याची आधीच नाजूक स्थिती आहे. अनिश्चित भविष्यातील पीक लक्षात घेता, भारतानं प्रथिने तसंच तेलबियांच्या पुरवठ्याला प्राधान्य दिलं पाहिजे. वाढती टंचाई लक्षात घेता, दोन्ही देशांमधील कृषी व्यापारासाठी बॅक चॅनेल दळणवळण सुरूच ठेवण्याची गरज आहे.
भारतानं केली US$ 4.25 अब्ज डॉलरची निर्यात : कॅनडामधील निर्यातीबाबत, आंतरराष्ट्रीय व्यापारावरील संयुक्त राष्ट्रांच्या COMTRADE डेटाबेसनुसार, भारतानं 2022 मध्ये सुमारे US$ 4.25 अब्ज डॉलरची निर्यात केली होती. याचा थेट दोन्ही देशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
- PM Trudeau Allegation On India : भारताबाबत काही आठवड्यांपूर्वीच केले होते आरोप, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंचा खुलासा
- India Canada Row : ट्रूडोचे आरोप 'राजकीयदृष्ट्या प्रेरित', कॅनडातील सुरक्षा परिस्थितीमुळं व्हिसा सेवा बंद
- Canada Demanded Security For Diplomats : व्यावसायिक दूतावासांना सुरक्षा देण्याची कॅनडाची भारताकडे मागणी