दुबई - आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. तर, प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 111 धावाच करू शकला. त्यासाठी इब्राहिम झद्रानने सर्वाधिक नाबाद 64 धावा केल्या. (IND vs AFG) मुजीब उर रहमानने 18 आणि रशीद खानने 15 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ बळी घेतले. अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्विन आणि दीपक हुडा यांना प्रत्येकी एक यश मिळाले. तत्पूर्वी, विराट कोहलीने भारताच्या डावात शानदार शतक झळकावले. त्याने 122 धावांची नाबाद खेळी खेळली.
भारताचा महान फलंदाज विराट कोहलीची प्रतीक्षा अखेर आजच्या सामन्यात संपली. दुबईत सुरू असलेल्या आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीच्या सामन्यात कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने 122 धावांची नाबाद खेळी खेळली. विराटने 61 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि सहा षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 200.00 होता. शतक झळकावल्यानंतर कोहलीने अंगठीचे चुंबन घेतले. त्यांनी असे का केले हे लोकांना जाणून घ्यायचे होते. या खेळीनंतर विराटने याचा खुलासाही केला.
कोहली म्हणाला, "मला सध्या खूप छान वाटत आहे, मी खूप कृतज्ञ आहे. गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवले आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. मी नोव्हेंबरमध्ये 34 वर्षांचा होणार आहे असही तो म्हणला. मला या फॉरमॅटमध्ये शतकाची अपेक्षा नव्हती. मी संघात परतल्यावर सर्वांनी माझे स्वागत केले. मी अंगठीचे चुंबन घेतले. कठीण काळात अनुष्का शर्मा माझ्या पाठीशी उभी राहिली. हे शतक अनुष्का आणि मुलगी वामिकासाठी आहे असही तो म्हणाला.
विराट पुढे म्हणाला, “खेळापासून दूर राहून मी खूप काही शिकलो. लोक माझ्या शतकाबद्दल बोलत होते. मी सहा आठवड्यांचा ब्रेक घेतला. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलो होतो. मला माझ्या संघाला सर्वोत्तम कामगिरी करायची होती. आता मला माझी लय सापडली आहे. हे माझ्यासाठी तसेच संघासाठी चांगले आहे असही तो म्हणाला आहे.
कोहलीने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर नोव्हेंबर 2019 मध्ये दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यासाठी 84 डाव लागले आहेत. तुफानी फलंदाजी करताना कोहलीने मैदानाभोवती फटकेबाजी केली. त्याच्या कारकिर्दीतील हे 71 वे शतक आहे.