ETV Bharat / bharat

Independence Day 2023 : पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना घातला रुबाबदार फेटा अन् कुर्ता, जाणून घ्या पोशाखाचे वैशिष्ट्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पारंपरिक कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. त्यांनी परिधान केलेल्या फेट्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

Independence Day 2023
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 15, 2023, 12:32 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन आज देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध विषयाला हात घातला. मात्र पंतप्रधानांच्या जबरदस्त भाषणांसह त्यांच्या रुबाबदार दिसणाऱ्या फेट्यासह पेहरावांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास राजस्थानी बांधणीचा फेटा आणि तितकाच उठावदार कुर्ता स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी परिधान केला होता.

खास राजस्थानी बांधणीचा फेटा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात काळ्या रंगाचे व्ही नेक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि चुडीदार परिधान केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची चांगलीच चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोक्यावर खास राजस्थानी बांधणीचा फेटा शोभून दिसत होता. हा फेटा खास राजस्थानची शान म्हणून ओळखला जातो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे फेट्याचे आकर्षण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेट्याचे प्रचंड आकर्षण असल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा 2014 मध्ये पंतप्रधान झाले होते, तेव्हा त्यांनी लाल किल्ल्यावरुन पहिल्यांदा जनतेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंडद लाल रंगाचा जोधपुरी फेटा बांधला होता. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता. हीच परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवली आहे.

लाल किल्ल्यावरुन विरोधकांवर हल्लाबोल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करताना विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी काही पक्ष केवळ आपल्या कुटुंबाद्वारेच चालवले जातात, अशी टीका केली. या पक्षाचा मंत्र केवळ आपल्या कुटुंबीयांचे हित करण्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. देशात महिलांच्या नेतृत्वात विकास सुरू असल्याचेही पंतप्धान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. भारत आगामी पाच वर्षात जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करताना स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Independence Day 2023 : 2047 ची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आगामी 5 वर्ष ठरणार महत्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पुढच्या वर्षी. . .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.