ETV Bharat / bharat

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी घातला डौलदार तिरंगी फेटा

पीएम मोदींनी 2018 मध्ये भगवा फेटा परिधान केला होता. कच्छच्या लाल बांधणी फेट्यापासून पिवळ्या राजस्थानी फेट्यापर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातही मोदींचा फेटा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. यावर्षी मोदींनी तिरंगी फेटा परिधान केला होता.

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी घातला डौलदार तिरंगी फेटा
स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी घातला डौलदार तिरंगी फेटा
author img

By

Published : Aug 15, 2022, 9:53 AM IST

Updated : Aug 15, 2022, 10:04 AM IST

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 76 व्या स्वातंत्र्यदिनी तिरंगी पट्ट्यांचा फेटा परिधान केला होता. त्यांचा फेटाही आकर्षणाचे कंद्र ठरत होता. पारंपारिक कुर्ता आणि चुरीदार पायजमा यांच्यावर निळे जाकीट आणि काळे बूट परिधान केलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकावला आणि सलग नवव्यांदा राष्ट्राला संबोधित केले. त्याचबरोबर, मोदींनी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आकर्षक, चमकदार आणि रंगीबेरंगी फेटा परिधान करण्याचा ट्रेंड मोदींनी चालू ठेवला. पंतप्रधानांचा फेटा मागे लांब होता आणि त्यावर तिरंग्याचे पट्टेही होते.

गेल्यावेळी स्वातंत्र्यदिनी मोदींनी भगवा फेटा परिधान केला होता. ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेल्या समारंभात मोदींनी भगवा आणि क्रीम रंगाचा फेटा परिधान केला होता. पंतप्रधानांनी कुर्ता आणि चुरीदार पायजमा परिधान केला होता. त्यांनी भगवी किनार असलेला पांढरा गमछा देखील घातला होता. जो त्यांनी कोविड-19 विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरला होता. 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक रंगांनी बनवलेला फेटा परिधान केला होता. लाल किल्ल्यावरून हे त्यांचे सलग नववे भाषण होते.

देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधानांनी 2014 मध्ये ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा देशाला संबोधित केले तेव्हा त्यांनी गडद लाल आणि हिरवा जोधपुरी बांधेज फेटा घातला होता. 2015 मध्ये, पंतप्रधान मोदींनी विविधरंगी पट्ट्यांसह पिवळा फेटा परिधान केला होता, तर 2016 मध्ये त्यांनी गुलाबी आणि पिवळा लेहेरिया 'टाय आणि डाई' फेटा निवडला होता. 2017 मध्ये सोनेरी पट्ट्यांसह चमकदार लाल रंगाचा फेटा घातला होता.

मोदींनी 2018 मध्ये भगवा फेटा परिधान केला होता. कच्छच्या लाल बांधणी फेट्यापासून पिवळ्या राजस्थानी फेट्यापर्यंत, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातही मोदींचा फेटा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा - Independence Day भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हर घर तिरंगा मोहिम वाचा सविस्तर

Last Updated : Aug 15, 2022, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.