ETV Bharat / bharat

IND vs SA ODI Series : वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; शिखर धवनकडे संघाची धुरा, 'या' नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी - Cricket News in Marathi

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी ( IND vs SA ODI Series ) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली ( Indian squad announced for ODI series ) आहे. ज्यामध्ये 16 सदस्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर या संघाच्या नेतृत्वाची धुरा शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan ) खांद्यावर असणार आहे.

शिखर धवन
Shikhar Dhawan
author img

By

Published : Oct 3, 2022, 10:27 AM IST

नवी दिल्ली: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ( IND vs SA ODI Series ) देखील खेळणार आहे. या मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. यासाठी अखिल भारतीय निवड समितीने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली ( Indian squad announced for ODI series ) आहे. या संघाची कमान शिखर धवनकडे ( Captain Shikhar Dhawan ) सोपवण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. भारत अ संघाचा कर्णधार संजू सॅमसनला ( Wicketkeeper Sanju Samson ) ही जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा होती मात्र तरी तसे झाले नाही. इशान किशन आणि संजू सॅमसन यांचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.

या दोन खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली संधी -

या 16 सदस्यीय संघात मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदार ( Batsman Rajat Patidar ) आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांना पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये संधी मिळाली. कोलकातामध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल 2022 एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी 112 धावा केल्या होत्या. तेव्हापासून पाटीदार सातत्याने फॉर्ममध्ये आहे. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही त्याने नाबाद 122 आणि 30 धावांची खेळी केली होती. अलीकडेच, त्याने न्यूझीलंड अ संघाविरुद्ध चार डावात दोन शतके झळकावली, त्यात 176 धावांच्या खेळीचा समावेश होता. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता. त्याने 106.33 च्या सरासरीने 319 धावा केल्या.

वेगवान गोलंदाज मुकेश कुमारबद्दल ( Fast bowler Mukesh Kumar ) सांगायचे तर, उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज मुकेश, ज्याने बंगालचे स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करतो. त्याने न्यूझीलंड अ विरुद्ध 21.78 च्या सरासरीने नऊ विकेट घेतल्या, ज्यात मालिकेच्या पहिल्या दिवशी 5/86 विकेट्स घेतल्या होत्या. या संघात मोहम्मद शमीचे नाव नाही, तर टी-20 विश्वचषकाच्या स्टँडबायमध्ये सहभागी असलेले दीपक चहर आणि रवी बिश्नोई यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय श्रेयस अय्यरचेही नाव आहे.

भारतीय संघ खालीलप्रमाणे -

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार आवेश खान, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक ( India vs South Africa ODI Series Schedule ) -

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 9 ऑक्टोबरला तर तिसरा आणि शेवटचा सामना 11 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

  • पहिला वनडे सामना - 6 ऑक्टोबर, अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियम लखनौ
  • दुसरा वनडे सामना - 9 ऑक्टोबर, जेएससीए क्रिकेट स्टेडियम रांची
  • तिसरा वनडे सामना - 11 ऑक्टोबर, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
  • हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.

हेही वाचा - India Vs South Africa 2nd T20 : भारताने 16 धावांनी दक्षिण आफ्रिकेला चारली पराभवाची धूळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.