ETV Bharat / bharat

अनिल अंबानी यांना इन्कम टॅक्सची नोटीस - 814 कोटी रुपयांची माहिती अनिल अंबानी

अनिल अंबानी यांना इन्कम टॅक्सची नोटीस
अनिल अंबानी यांना इन्कम टॅक्सची नोटीस
author img

By

Published : Aug 26, 2022, 12:18 PM IST

Updated : Aug 26, 2022, 1:39 PM IST

12:16 August 26

Income tax notice to Anil Ambani अनिल अंबानी यांना इन्कम टॅक्सची नोटीस

मुंबई अनिल अंबानी यांना इन्कम टॅक्सची नोटीस. 814 कोटी रुपयांची माहिती अनिल अंबानी यांनी लपवण्याचा ठपका. 31 ऑगस्ट पर्यंत नोटीशीला उत्तर देण्याची अनिल अंबानी यांना मुदत. अंबानी दोषी आढळल्यास काळा पैसा आणि विरोधातील कलमाखाली होऊ शकते शिक्षा.

दोन परदेशी बँकांमध्ये सुमारे 814 कोटी रुपये त्यांनी ठेवल्याची माहिती लपवली असल्याचा आरोप आहे. तशी नोटीस इनकम टॅक्सकडून दिली आहे. या रकमेवरील कर चुकवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता अनिल अंबानी आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसीला काय उत्तर देतात याकडेी लक्ष आहे. मुकेश अंबानी यांचे अनिल अंबानी हे सख्खे भाऊ आहेत. त्यांना इनकम टॅक्सने नोटीस पाठवल्यामुळे चर्चांनाही उधाण आले आहे.

अनिल अंबानी यांनी आयकर चुकवण्यासाठी परदेश बँकेतील खाती आणि मालमत्तेबाबतची माहिती लपवली, असा आरोप इनकम टॅक्सकडून करण्यात आला आहे. अनिल अंबानी यांना 31 ऑगस्टपर्यंत या नोटीसीला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे. यात ते दोषी आढळल्यास 2015मधील काळा पैशांविरोधातील कलम 50 आणि 51 अन्वये त्यांना दंडासह 10 वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते.

अंबानी बहामास येथील इकाई डायमंड ट्रस्ट आणि अन्य एका नॉर्दर्न एटलांटिक ट्रेडिंग अनलिमिटेड या कंपनीसोबत जोडलेले आहे. या कंपनीसोबत आलेली मिळकत आणि मालमत्ता ही अनिल अंबनींची असल्याचा आरोप आहे. 814 कोटी पेक्षा अधिक रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेवरुन आता अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Aug 26, 2022, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.