बेंगळुरू - कर्नाटकातील उडुपी येथे शुक्रवारी सुरू असलेल्या हिजाबच्या वादामुळे दोन विद्यार्थ्यांना (वर्ग 12) परीक्षेला बसू दिले गेले नाही. आलिया आणि रेशम अशी त्यांची नावं आहेत. ( hijab Case in Udup ) त्या दोघी हिजाब घालून परीक्षेसाठी आल्या होत्या. शाळेच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना हिजाब घालून बसण्यास परवाणगी दिली नाही. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षा न देताच परीक्षा केंद्रातून निघून गेले.
परीक्षेकडे दुर्लक्ष करून संकटात सापडू नका - शुक्रवारी तब्बल 6.84 लाख विद्यार्थ्यांनी कडेकोट बंदोबस्तात कर्नाटकमध्ये II PUC (वर्ग 12) परीक्षेला बसले होते. हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावर ते काढून परीक्षेला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. जीवापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही, असा सल्लाही त्यांनी दिला. "परीक्षेकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर संकटात सापडू नका, उज्ज्वल भविष्याकडे पहा. असही ते म्हणाले आहेत.
महाविद्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले - कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना II PUC परीक्षेला बसू देणार नाही अशी घोषणा केली आहे. परीक्षेदरम्यान कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्यासही बंदी घालण्यात आली आहे. उडुपी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेजशी संलग्न असलेल्या चार विद्यार्थिनी, ज्यांनी हिजाब विरोध सुरू केला होता, त्यांनी परीक्षेला हजेरी लावली नाही. त्यांचे हॉल तिकीटही घेतले नसल्याचे महाविद्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी देखील परीक्षेसाठी नोंदणीकृत आहेत - ही परीक्षा 1,076 परीक्षा केंद्रांवर घेतली जात असून एकूण 3,46,936 मुले आणि 3,37,319 मुली परीक्षा देत आहेत. 74 विद्यार्थ्यांना ऑटिझम, 377 श्रवणदोष, 371 शिकण्यात अक्षमता, 683 लोकोमोटर कमजोरी (एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यात समस्या), 128 मतिमंदता, 103 एकाधिक अपंगत्व, 48 वाक् व्यंग, 355 दृष्टीदोष आणि अंधत्व (55) दृष्टीदोष (कमी दृष्टी) विद्यार्थी देखील परीक्षेसाठी नोंदणीकृत आहेत.
हेही वाचा - Lalu Prasad Yadav Bail : लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन