हैदराबाद देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 92 नव्या कोरोना रुग्णांची Corona cases in India नोंद झाली आहे. यामुळे आता अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची corona cases in india संख्या ही 1 लाख 16 हजार 861 इतकी झाली आहे. एकूण रुग्णांची new corona patients संख्या ही 4 कोटी 42 लाख 53 हजार 464 इतकी आहे. मृतांची संख्या 5 लाख 27 हजार 37 इतकी झाली असून 41 जणांचा मृत्यू झाला असल्याची new corona patients india माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली.
हेही वाचा Rushdie off ventilator and talking सलमान रश्दींची उपचारांना साथ व्हेंटीलेटर काढले
दैनिक पॉझिटिव्हिटी दर हा 3.69 इतका असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 4.57 टक्के इतका आहे. मंत्रालयानुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4 कोटी 36 लाख 9 हजार 566 वर पोहोचली आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. तसेच, देशव्यापी कोविड - 19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 207.99 कोटी डोस देण्यात आले आहेत.
मुंबईतील रुग्णसंख्या मुंबईत काल ८६७ नवे रुग्ण आढळून आल्याचे समोर आले. शुन्य मृत्यूंची नोंद झाली आहे. ४८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३१ हजार ७०६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ७ हजार ४१९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ६२४ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १३५२ दिवस इतका आहे.
हेही वाचा Junjunwala Is No More शेअर बाजाराचे किंग राकेश झुनझुनवाला काळाच्या पडद्याआड