ETV Bharat / bharat

Narayana Murthy : भारतात वास्तविकतेचा अर्थ भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते आणि प्रदूषण - नारायण मूर्ती

जीएमआरआयटीच्या रौप्यमहोत्सवी समारंभात नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी कंपनीचे अध्यक्ष म्हणून आपली सर्वात मोठी खंत उघड केली. (Narayana Murthy at GMRIT). भारतातील वास्तविकता आणि सिगापूरमधील वास्तविकता यात मोठा फरक असल्याचे त्यांनी म्हटले. (in india reality means corruption dirty roads). (indian reality and Singapore reality).

Narayana Murthy
Narayana Murthy
author img

By

Published : Dec 19, 2022, 5:33 PM IST

विजयनगरम (आंध्र प्रदेश) : जीएमआरआयटीच्या रौप्यमहोत्सवी समारंभात इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती (Narayana Murthy) म्हणाले की, भारतात वास्तविकतेचा अर्थ भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते आणि प्रदूषण हे आहे. (in india reality means corruption dirty roads). मात्र सिंगापूरमध्ये याचा अर्थ स्वच्छ रस्ते आणि प्रदूषणमुक्त वातावरण आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, कशाच्याही अभावाकडे बदलाची संधी म्हणून पाहिली पाहिजे. कोणीही दुसऱ्या कोणीतरी बदल घडवून आणण्याची वाट पाहू नये. (Narayana Murthy at GMRIT).

  • In India, reality means corruption, dirty roads, pollution&many times no power. Reality in Singapore means clean road, no pollution&lots of power. Your responsibility to create that new reality: Infosys founder NR Narayana Murthy at GMRIT, as cited in GMR release

    (Pic: Infosys) pic.twitter.com/Ebnv2V45Ci

    — ANI (@ANI) December 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तरुणांवर नवीन वास्तव निर्माण करण्याची जबाबदारी : एन.आर नारायण मूर्ती म्हणाले की, वास्तव हे 'तुम्ही बनवता ते' आहे. संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात नारायण मूर्ती यांनी उद्धृत केले की, "हे नवीन वास्तव निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे. तरुणांनी समाजात बदल घडवून आणण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे. वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक, समाज आणि राष्ट्राचे हित जपायला शिकले पाहिजे". या कार्यक्रमात नारायण मूर्ती यांनी कंपनीचे अध्यक्ष म्हणून आपली सर्वात मोठी खंत उघड केली. संस्थापकांच्या मुलांना कंपनीच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेत सहभागी करून घेऊ नये हे चुकीचे असल्याचे मूर्ती म्हणाले. नेक्स्ट जनरेशन प्रमोटर ग्रुपला इन्फोसिसच्या बाहेर ठेवणे चुकीचे असल्याचे मूर्ती म्हणाले.

उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा : नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, तरुणांनी समाजात बदल घडवून आणण्याचा विचार केला पाहिजे. त्यांनी वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता समाज आणि देश पुढे ठेवण्याचा विचार केला पाहिजे. जीएमआर ग्रुपचे चेअरमन जीएम राव यांचे उदाहरण देऊन ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि शक्य असेल तेव्हा उद्योजक बनून अधिकाधिक नोकऱ्या निर्माण कराव्यात. अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करूनच गरिबी हटवता येईल आणि मागासलेल्या लोकांना मदत करता येईल. त्याचवेळी जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष जीएम राव म्हणाले की, नारायण मूर्ती हे तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत.

इन्फोसिसची स्थापना आजपासून ४१ वर्षांपूर्वी झाली. ही भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. एनआर नारायणमूर्ती, नंदन एम नीलेकणी, एस गोपालकृष्णन, एसडी शिभुलाल आणि के दिनेश हे त्याचे संस्थापक सदस्य होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.