गांधीनगर (गुजरात) - गाधीनगर येथील वरदायिनी मंदिर ( Vardayini mata decorated with dollars ) प्रकाशझोतात आले आहे. या देवीला डॉलरची आरास करण्यात आली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका भक्ताने बुधवारी मंदिराला डॉलर दान केले होते. त्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांनी आणि कार्यवाहकांनी देवी वरदायिनीला डॉलरने सजवले. देवीला केलेली ही आरास सध्या चर्चेचा विषय ठरली असून, ती नागरिकांचे लक्ष वेधत आहे.
हेही वाचा - Manmohan Singh : 'कमी बोललो, काम जास्त केले'; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल
दागिन्यांसह डॉलरने मातेच्या मूर्तीचे सुशोभिकरण
माघी पूर्णिमेच्या दिवशी (बुधवारी) वरदायिनी मातेला दागिन्यांनी सुशोभित करण्यात आले. त्याचबरोबर, मातेच्या मूर्तीला 1 हजार 500 डॉलरनी सजवण्यात आले. डॉलर दान करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आलेले नाही. मात्र, या मंदिराला येणाऱ्या दानचा 50 टक्के भाग हा विकास कार्यात खर्च केला जातो.
तुपाने अभिषेक करण्याची परंपरा
वरदायिनी मातेचे तुपाने अभिषेक करण्यात येते. येथे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पल्ली महोत्सव साजरा करण्यात येतो. मातेच्या पल्ली स्वरुपाचे दर्शन करण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. महाभारत काळापासून देवीला तुपाने अभिषेक करण्याची परंपरा असल्याची येथे मान्यता आहे.
काय आहे मान्यता?
तुपाने वरदायिनी मातेचा अभिषेक केल्याने आशीर्वादांचा वर्षाव होते, अशी मान्यता आहे. दरवर्षी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पल्ली समारंभाचे आयोजन केले जाते. यावेळी भक्तांची मोठी मांदियाळी असते. नवरात्रीच्या नवमीला येथे लाखडाने बनवलेल्या एका रथाला पूर्ण गावात फिरवले जाते. या रथावर केलेल्या साच्यात पाच ठिकाणांवर अखंड ज्योतीची स्थापन केली जाते.
हेही वाचा - New Safety Rules for Kids : लहान मुलांनाही हेल्मेट अनिवार्य, वाच काय आहेत नवे नियम, अन्यथा भरावा लागेल दंड