महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा :
नरेंद्र मोदींचा गुजरात दौऱ्याचा तिसरा दिवस (Narendra Modi Gujarat visit) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा तिसरा दिवस असून ते आज अहमदाबादमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.
अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस (Amitabh Bachchan Birthday) : आज अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस आहे. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर त्यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा होणार आहे.
आज शिंदे गटाला चिन्ह मिळणार (Shinde Faction Shivsena Symbol ) : काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला काल 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' व मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले. आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शिंदे गटाला चिन्ह मिळणार आहे.
मुलायम सिंह (Mulayam Singh Yadav) यांच्यावर आज अंतिम संस्कार : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी 3 वाजता अंतिम संस्कार होणार आहे. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या महसूल विभागकार्यालयाचे राज्यपाल करणार उद्घाटन : 11 ऑक्टोबरला राज्यपाल कोश्यारी शुभारंभ करणार आहेत. उद्घाटन कार्यक्रम 11 ऑक्टोबरला सकाळी 11.00 वाजता पार पडेल. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) करणार उद्घाटन यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.