ETV Bharat / bharat

Top News Today : वाचा एका क्लिकवर ; आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या - मराठी बातम्या

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेवू या. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. (News stories of national and local importance )

Top News Today
महत्त्वाच्या बातम्या
author img

By

Published : Oct 25, 2022, 6:45 AM IST

मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. आज सूर्यग्रहण, मुख्यमंत्र्यांचा भामरागड दौरा, पश्चिम बंगालमध्ये सितरंग चक्रावादळाची शक्यता, शरद पवारांचा इंदापूर दौरा, शंभूराज देसाईंचा सातारा दौरा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद या विशेष घडामोडी आहेत.

आज सूर्यग्रहण (Solar eclipse today) : आज पश्चिम महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मुंबईतून संध्याकाळी 4.49 वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होणार आहे. ग्रहणाचा मध्य संध्याकाळी 5.43 वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. सूर्यास्त ग्रहणातच होईल.

आज मुख्यमंत्र्यांचा भामरागड दौरा (CM Bhamragarh Visit Today) : आज मुख्यमंत्री भामरागड दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दोडराजमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. ते दुपारी 12 वाजेपर्यंत दोडराजला जाणार आहेत. तिथे ते अर्धा तास दिवाळी साजरी करतील.

आज पश्चिम बंगालमध्ये सितरंग चक्रावादळाची शक्यता (Cyclone Sitarang likely in West Bengal Today) : सितरंग चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सितरंग चक्रीवादळ आज सकाळी बांग्लादेशच्या बोरिशाल जवळील तिनकोना द्वीप आणि सनद्वीप या दरम्यान प्रवास करण्याची शक्यता आहे.

आज शरद पवारांचा इंदापूर दौरा (Sharad Pawar Indapur visit today) : आज शरद पवार इंदापूर दौऱ्यावर आहेत. ते आज ते इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

आज शंभूराज देसाईंचा सातारा दौरा (Shambhuraj Desai Satara visit today) : आज साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सातारा दौऱ्यावर आहेत. ते आज सकाळी 11.30 वाजता पाटण तालुक्यातील तारळे, वेखंडवाडी, पांढरवाडी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पहाणी करणार आहेत.

आज काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद (Congress leader Jairam Ramesh press conference) :आज काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद आहे. ते आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय येेेेेेेेेथे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेला संबोधित करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.