- 1) Republic Day 2021 : आज देशभरात साजरा होणार 72 वा प्रजासत्ताक दिन
नवी दिल्ली - आज भारतामध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारताला 'प्रजासत्ताक राष्ट्र' म्हणून घोषित केले व याचदिवसापासून भारताची राज्यघटना लागू झाली होती. आज राष्ट्रपती इंडिया गेटवर राष्ट्रध्वज फडकावतील. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानीतील सुरक्षा अजूनच कडक करण्यात आली आहे. शहरात हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, शहरातील व्यस्त बाजारपेठ व भागात गस्त वाढविण्यात आली आहे.
- 2) शेतकरी संघटनांचा आज ट्रॅक्टर मार्च
कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना आणि सरकारच्या प्रतिनिधिंमध्ये अनेक बैठका झाल्या. पण त्यावर कुठलाही तोगडा निघू शकलेला नाही. यानंतर आक्रमक पवित्रा घेत शेतकऱयांनी आज ट्रॅक्टर मार्चचे आयोजन केले आहे.
- 3) अखिल भारतीय किसान सभेच्या मुंबईतील आंदोलनाचा आज दुसरा दिवस
अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा अखेर मुंबईत पोहोचला आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 26 जानेवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चानं हे आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात नाशिकहुन मुंबईला हा मोर्चा पोहोचला आहे.
- 4) राज्यात प्रजासत्ताक दिन होणार उत्साहात साजरा
आज प्रजासत्ताक दिन राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वाजता शिवाजी पार्क येथे राज्य शासनाकडून ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे भाषण होणार आहे.
- 5) 'तुरुंग पर्यटन' संकल्पनेचे पुण्यातील येरवडा येथे आज उद्घाटन
पुणे - महाराष्ट्रातील सर्वात मोठे तुरुंग म्हणून ओळख असलेले पुण्यातील येरवडा तुरुंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्य सरकारने आता येरवडा तुरुंगात 'तुरुंग पर्यटन' अशी संकल्पना मांडत आज, 26 जानेवारीपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी 'तुरुंग पर्यटन' या संकल्पनेचे उद्घाटन करणार आहेत.
- 6) अजित पवार यांच्या हस्ते आज शिवाजीनगर येथे होणार ध्वजारोहण
पुणे - प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आज सकाळी 9 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर येथे ध्वजारोहण सोोहळा होणार आहे.
- 7) गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपुर - नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार असल्याने आदिवासी समाज विरोध करणार असून, काळ्या फिती दाखवण्याची शक्यता आहे.
- 8) आजपासून मुंबईतील दोन मार्गावर फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी
मुंबई - वांद्रे-वरळी लिंक आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अखेर आज, 26 जानेवारीपासून 100 टक्के फास्टॅगची अंमलबजावणी होणार आहे. या दोन्ही मार्गावर फास्टॅग ही अत्याधुनिक टोल वसुलीसाठीची इलेक्ट्रॉनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करण्यासाठी वाहनांना फास्टॅग लावण्याची गरज आहे.
- 9) जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळगाव - आज देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.
- 10) मुंबईत आज राष्ट्रवादीकडून जनता दरबाराचे आजोजन
मुंबई - आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात 'जनता दरबार' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.