ETV Bharat / bharat

वाचा एका क्लिकवर; काय होणार आज दिवसभरात... - न्यूजटुडे

आज या घडामोडींवर असणार खास नजर

NewsToday
NewsToday
author img

By

Published : Jul 30, 2021, 6:08 AM IST

  • मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (30 जुलै) कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री सकाळी 9 वाजता विमानाने मुंबईहून कोल्हापूरला जाणार आहेत. सकाळी 10 वाजता ते कोल्हापुरात पोहचतील. त्यानंतर साडेअकरा वाजता शिरोळ येथील नरसिंह वाडी येथे पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता कोल्हापूर शहरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. दुपारी 2 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.

  • ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांचा आज कोल्हापूर दौरा

कोल्हापूर - महावितरण वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. कोल्हापूर व सांगली येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे आज, 30 जुलै रोजी या परिसराचा दौरा करणार आहेत. डॉ. राऊत हे सकाळी 9.00 वाजता कराडहून सांगलीकडे प्रयाण करतील. इथला दौरा झाल्यानंतर ते दुपारी 2.30 वाजता सांगलीहून कोल्हापूरकडे प्रयाण करतील. कोल्हापूर जिल्ह्यातील बापट कॅम्प, नागाळा पार्क, दुधाळी उपकेंद्र येथील विद्युत विभागाच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर पुरग्रस्तांची विचारपूस करून गरजवंतांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे सायंकाळी 5.30 वाजता माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.

  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही आज कोल्हापूर दौरा

कोल्हापूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सकाळी 9 वाजता आंबेवाडी आणि चिखली गावातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. तेथून परत कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी आजपासून सुरू

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी कोरोनाचे नियम पाळून आजपासून सुरू करण्यात येत आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. त्याचं अनुषंगाने आता कोरोनाचे नियम पाळून व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीला जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.

  • मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील कोरोना स्थितीचा आज घेणार आढावा

नाशिक - पालकमंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोनाबाबतची माहिती ते घेणार आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

  • शिल्पा शेट्टीने 29 माध्यम संस्थांवर अब्रुनुकसानीचा ठोकला दावा, आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई - पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 29 माध्यम कंपन्या आणि संस्थांवर मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • ममता बॅनर्जींच्या दिल्ली दौऱ्याचा आज अखेरचा दिवस

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या. दिल्ली दौऱ्याचा त्यांचा आज अखेरचा दिवस आहे. या दौऱ्यात ममता बॅनर्जी यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.