ETV Bharat / bharat

Guru Purnima : गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष; जाणून घ्या गुरुपौणिमेचे महत्त्व, महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम

13 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा ( Guru purnima ) म्हणून साजरा केला जाते. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. आपल्या जीवनात गुरुचे अन्यनसाधारण महत्त्व हे आहे. त्यामुळे गुरु पौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Guru Purnima
गुरुपौणिमा
author img

By

Published : Jul 12, 2022, 10:09 PM IST

हैदराबाद - 'गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष। गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष'।। गुरुच्या परिस स्पर्षाशिवाय मनुष्यातील अज्ञान रुपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलितही होत नाही. गुरुच्या सहवासाशिवाय सत्य-असत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य, काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर सांगतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. जीवन जगताना कोणाला आई-वडिलांच्या कष्टातून-शिकवणीतून गुरु भेटले तर कोणाला शिक्षकांच्या एका प्रोत्साहनपर शब्दाने आयुष्याची दिशा मिळाली. महाराष्ट्राची माती आणि माणसे यांनाच काही एकलव्यांनी गुरु मानले तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारी आणि नवे काहीतरी शिकवणारी प्रत्येक व्यक्ती मग ते आई-वडील, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र कोणीही असेल, पण त्यांच्याकडून चांगले तेवढे घेण्याची वृत्ती जागृत ठेवून असली पाहिजे.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व - आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असतात. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा करतो.

शिर्डीत गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव - शिर्डीत गुरूपोर्णिमा उत्सवास ( Gurupornima celebration in Shirdi ) भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासुन ते साईंची प्रतीमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या व्दारकामाई पर्यंत नेण्यात आली. व्दारकामाईत अखंड पारायणाच वाचन करुन, गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवानिमीत्त साई मंदिराला ( Sai Temple ) आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो. सविस्तर वाचा - Guru pournima celebrations : साईबाबांच्या शिर्डीत 115 व्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या (Shirdi Temple) वतीने मंगळवार दिनांक १२ जुलै ते गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ या काळात गुरुपौर्णिमा उत्सव (How will be Celebrated Gurupournima festival in Sai temple) साजरा केल्या जाणार आहे. या उत्सवात सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केले आहे. सविस्तर वाचा - Gurupournima Festival :अश्या पद्धतीने साजरा होणार साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव.....

महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुरु पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ते पुढील प्रमाणे -

पुणे - पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला आहे. तसेच बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) गुरुपौर्णिमा उत्सव बुधवार दिनांक १३ जुलै रोजी साजरा होणार आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिराला आकर्षक पुष्परचना व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त बेलबाग चौकापासून मंदिरापर्यंत दुतर्फा श्री दत्त महाराजांचे चार अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, माणिकप्रभू, अक्कलकोट स्वामी समर्थ व संत परंपरेतील श्री वासुदेवानंद सरस्वस्ती टेंबे स्वामी, माधवनाथ महाराज, गजानन महाराज, साईबाबा, शंकरमहाराज, गोंदवलेकर महाराज, नाना महाराज तराणेकर तसेच श्री महादेवांसह श्री दत्त महाराज व क्रमाने सर्व नवनाथांच्या लावलेल्या आकर्षक तसबिरी हे खास वैशिष्ट्य आहे.

पंढरपूर - बुधवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी सहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान मानाच्या दहा पालख्या आहेत. त्या दहा पालख्यातील पादुका विठ्ठलाच्या भेटीसाठी मंदिरात आणल्या जातात. त्यानंतर बारा वाजता गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. गोपाळकाला झाल्यानंतर काही पालख्या या पुन्हा मंदिराकडे जातात. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मंदिर समितीच्यावतीने नगर प्रदक्षिणा घातली जाते.

नाशिक - गुरुपौर्णिमानिमित्त त्र्यंबकेश्वर येथील स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी 7 वाजता व्यास पूजन, 8 30 वाजता महारुद्र याग, 10.30 वाजता संगीत, भजन, सत्संग व गुरुपूजन तसेच दुपारी 12 ते 3 या वेळात महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तुळजापूर (उस्मानाबाद) - श्री गुरुपौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुपौर्णिमा देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होते. गुरु पौर्णिमेनिमित्त कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये श्रींचे धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. मंगळवार रोजी छबिना, बुधवार रोजी छबिना व जोगवा, गुरुवारी छबिना होणार आहे. गुरु पौर्णिमेनिमित्त असे धार्मिक कार्यक्रम श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा - Shiv Senas letter to the Governor: तो पर्यंत मंत्रीपद अथवा कोणत्याही नियुक्त्या करु नका शिवसेनेचे राज्यपालांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.