मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. यामुळे मुंबई, गोवा आणि दक्षिण कोकण भागातील काही ठिकाणी आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या आसपासच्या भागात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारीपर्यंत हे लक्षद्वीपपर्यंत पोहचले. येत्या 24 तासांत त्याचे च्रकीवादळात रुपांतर होईल, अशी चेतावणी भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
चक्रीवादळ कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून 18 मेच्या संध्याकाळी मार्गक्रमण करेल आणि त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरातला पार करत पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल, अशी माहिती आयएमडीने दिली. त्यामुळे शनिवारी दक्षिण कोकण आणि गोवाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. यानंतर ते आणखी तीव्र होत रविवारी व सोमवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
IMD चा पावसाचा अंदाज -
हवामान विभागाच्या मते, 24 तासांत 64.5 मिमी ते 115.5 मिमी पाऊस पडला. तर तो अतिवृष्टीचा मानला जाईल. तर 115.6 मिमी ते 204.4 मिमी दरम्यान होणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून गणला जातो.
सौराष्ट्र आणि कच्छमध्ये 18 मे रोजी मुसळधार पाऊस -
गुजरात किनारपट्टीवर 17 मेपासून पाऊस पडेल. 18 मे ला सौराष्ट्र आणि कच्छ येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहेत. तर कच्छ आणि लगतच्या राजस्थानमध्ये 19 मेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या वादळाचा या भागावर परिणाम होईल.
मराठवाड्यात वेगाने वारे वाहतील
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी व सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,. तर मुंबई, ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल. शनिवारी रायगड येथेही वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, नांदेड तसेच सांगली, सोलापूर, अहमदनगर, सातारा, पुणे आणि कोल्हापूरसह मराठवाडा प्रदेशात शुक्रवारी वादळी वार वाहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कर्नाटकचे सर्व मंत्री एक वर्षाचे वेतन कोरोना मदतनिधीला देणार