डेहराडून Maharashtra Vivek Jhade in IMA POP : महाराष्ट्राचे विवेक झाडे यांना एकदा इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये अधिकारी झाल्यावर 7 वर्षांच्या संघर्षाची आठवण झाली. खरं तर आज विवेक यांनी आपल्या खांद्यावर जे दोन स्टार सजवले आहेत, त्यामागे त्यांचा 7 वर्षांचा संघर्ष होता. त्यामुळे त्यांनी अकादमीत आणि नंतर सैन्यात अधिकारी होण्याचा प्रवास पूर्ण केला.
7 वर्षांची मेहनत : इंडियन मिलिटरी अकादमीतून उत्तीर्ण होऊन सैन्यात अधिकारी होण्याच्या या प्रवासासाठी अनेक कॅडेट्सनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे संघर्षात घालवली. विवेक झाडे हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. 2016 ते 2023 या काळात त्यांनी खूप मेहनत घेतली. या काळात त्यांनी कधीही स्वतःला त्यांच्या उद्देशापासून विचलित होऊ दिलं नाही. विवेक झाडे म्हणतात, आज पिपिंग सेरेमनी दरम्यान त्यांना जे स्टार्स मिळाले, त्यामागे 7 वर्षांची मेहनत आहे.
ध्येय गाठण्यासाठी फक्त ध्येयाकडं लक्ष असायला हवं. कोणत्याही अपयशाकडं पूर्णपणे दुर्लक्ष करूनच यश मिळवता येतं.- विवेक झाडे, मिलिटरी ऑफिसर
अभिमानाची भावना- विवेक झाडे यांनी इंडियन मिलिटरी अकादमीच्या कठीण प्रशिक्षणाचा आवर्जून उल्लेख केला. तसंच इंडियन मिलिटरी अकादमी ही देशातील सर्वोत्तम अकादमींपैकी एक असल्याचंही ते म्हणाले. या अकादमीच्या माध्यमातूनच सैन्यात उत्कृष्ट अधिकारी होण्याचा मार्ग तयार होतो. ही एक अशी संस्था आहे जिथं अनेक देशांतील कॅडेट्स प्रशिक्षण घेतात. येथे प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झाल्यामुळं अभिमानाची भावना येते. तसंच इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये कॅडेट्स 24 तास कार्यरत असतात, असंही त्यांंनी सांगितलं. आपले जुने दिवस आठवत विवेक म्हणाले की, सैन्यदलात अधिकारी होण्याकरिता 2016 पासून तयारी सुरू केली होती. 2019 मध्ये एनडीएच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले. त्यानंतर एक वर्ष त्यांनी आयएमएमध्ये प्रशिक्षण घेतलं.
- कठोर परिश्रम हा एकमेव मार्ग : यावेळी प्रतिक्रिया देत विवेक झाडेंच्या आई म्हणाल्या की, काहीही साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम हा एकमेव मार्ग आहे. विवेकनं 7 वर्षे कठीण परिश्रम घेतले. संघर्षाचे ते दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. मुलांचं संगोपन चांगलं झालं तर आई-वडिलांना असा आनंदाचा दिवस पाहायला मिळतो, असंही त्या म्हणाल्या.
कर्माचं फळं मिळालं : इंडियन मिलिटरी अकादमीत आपल्या मुलाला उत्तीर्ण झालेलं पाहण्यासाठी आलेले विवेक झाडे यांचे वडील पंडित राव झाडे म्हणाले की, ते स्वत: माजी सैनिक आहेत. त्यांचा सैन्याशी जुना संबंध आहे. आपल्या मुलानंही सैन्यात जावं अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी लहानपणापासूनच विवेकला तयार केलं. तसंच विवेकचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात झालं. अधिकारी बनण्यासाठी त्यानं खूप संघर्ष केला. ज्याची फळं त्याला आज मिळत असल्याच ते म्हणाले.
हेही वाचा -