ETV Bharat / bharat

Airport Bomb Scare: बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने विमानतळावर उडाला गोंधळ, दोन तास दिल्ली-विमान उड्डाण रखडले!

सुरक्षा एजन्सी आणि बॉम्बशोधक पथकाने उड्डाण थांबवून विमानाची सुरक्षा तपासणी केली. सुमारे दोन तासांच्या तपासानंतर बॉम्बची माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.

Airport Bomb Scare
Airport Bomb Scare
author img

By

Published : Jun 9, 2023, 9:52 AM IST

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच गोंधळ उडाला. महिला विमान प्रवाशाने विमान कर्मचाऱ्याला एका व्यक्तीच्या पिशवीत बॉम्ब असल्याचे सांगितले. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमान कर्मचाऱ्याने तातडीने विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेला ही माहिती दिली.

नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीहून मुंबईला जाणारे विस्तारा एअरलाइन्समध्ये बॉम्ब असल्याची विमान कर्मचाऱ्यांना गुरुवारी माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर तपासणीसाठी दोन तास विमान थांबवण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. विमानतळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून मुंबईला जाणारे विस्तारा एअरलाइन्सचे विमान ( फ्लाइट क्रमांक UK-941) हे गुरुवारी सायंकाळी 4.55 वाजता उड्डाण करणार होते. उड्डाणापूर्वी विमानातील एका महिला प्रवाशाने एअरलाइनच्या कर्मचाऱ्या सांगितले की एका प्रवासी फोनवर बॉम्बबाबत बोलत होता.

अफवा असल्याचे सिद्ध: सुरक्षा प्रोटोकॉल अंतर्गत विमानाच्या कॅप्टनने तात्काळ सीआयएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क केले. माहिती मिळताच विमानतळ सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग, विमानतळ ऑपरेटरने पुढील कार्यवाही सुरू केली. सुरक्षा कर्मचार्‍यांनी, सुरक्षा प्रोटोकॉलचा वापर करत टर्मिनलचे क्षेत्र आणि प्रवाशांचे सामान तपासण्यास सुरुवात केली. त्यानुसार सीएसआयएफ टीमने पाहणी केली. मात्र, त्यांना प्रवाशाच्या बॅगेत बॉम्ब सापडला नाही.सायंकाळी ६.४५ च्या सुमारास तपास पूर्ण झाल्यानंतर ही माहिती अफवा असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यानंतर 163 विमान प्रवाशांसह या विमानाला मुंबईला जाण्याची परवानगी देण्यात आली. दिल्ली पोलिसांनी महिला आणि पुरुष प्रवाशाला ताब्यात घेतले आले. याप्रकरणी पुरुष प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

मुंबईतही बॉम्ब असल्याची महिलेने पसरविली होती अफवा: सामानात बॉम्ब ठेवण्याचा दावा करणाऱ्या प्रवासी महिलेला मुंबईतील सहार पोलिसांनी नुकतेच अटक केली आहे. विमानतळावर सामान जास्तीचे झाल्याने पैसे वाचविण्यासाठीचा प्रयत्न करणे या महिलेला अंगलट आले आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-

  1. Mumbai Airport : विमानतळावर सामान अतिरिक्त झाल्याने कर्मचाऱ्यांनी मागितले पैसे; महिलेने असे काही सांगितले की थेट पोलिसांनी अटकच केली
  2. Suspected Bomb : नवी मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन; चौकशीत माहिती उघड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.