ETV Bharat / bharat

मोठा घातपात टळला! राजौरी-पुंछ महामार्गावरील आयईडी बॉम्ब निकामी - IED

राजौरी जिल्ह्यातील राजौरी-पुंछ महामार्गावर शनिवारी सकाळी आयईडी सापडल्यानंतर सीमा भागात दहशत पसरली आहे. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून लगेचच परिसर रिकामी करत बॉम्ब स्फोटक निकामी केले. तीन तासासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.

Rajouri
राजौरी
author img

By

Published : Jul 31, 2021, 12:45 PM IST

राजौरी - भारतीय लष्कारने जम्मू आणि काश्मीरमध्ये एक शक्तीशाली आयईडी (Improvised Explosive Device) निकामी केल्याने मोठा घातपात टळला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ राजौरी जिल्ह्यात ही कारवाई करण्यात सैन्याला यश आलं आहे.

राजौरी जिल्ह्यातील राजौरी-पुंछ महामार्गावर शनिवारी सकाळी आयईडी सापडल्यानंतर सीमा भागात दहशत पसरली आहे. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून लगेचच परिसर रिकामी करत बॉम्ब स्फोटक निकामी केले. तीन तासासाठी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.

बथुनीजवळ महामार्गावर एक बेवारस वस्तू पडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सैन्याचे संयुक्त पथक घटनास्थळी पोहोचले. बॉम्बशोधक पथकाने स्फोटक निकामी केल्याने मोठा अपघात टळला. कोणतीही इजा किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावर थांबलेली वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागबेरन-तरसर जंगलात चकमक -

जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या नागबेरन-तरसर जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान आज शनिवारी सकाळी चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. दहशतवाद्यांकडून एक AK आणि M4 जप्त केली आहे. परिसरात इतर दोन ते तीन दशतवादी लपल्याची माहिती जवानांना असून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजकडून गोळीबार होत आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

गेल्या सात महिन्यात 88 पेक्षा अधिक अतिरेकी ठार -

2021 मध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 88 पेक्षा अधिक अतिरेकी ठार मारले आहेत. यातील एकट्या जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात 16 जणांना कंठस्नान घातले. आतापर्यंत दहशतवाद संबंधित विविध घटनांमध्ये सुरक्षा दलातील 19 जवान हुतात्मा झाले आहेत.जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात शांती प्रस्थापित करणं अवघड आहे. पाकिस्तान आणि फुटिरतावादी या दोन घटकांमुळे या भागात कायम तणाव राहिला आहे. खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून करण्यात येत आहेत. मात्र, दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, बऱ्याच दहशतवाद्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणही केलं आहे.

हेही वाचा - सीमावादावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन सैन्यात आज चर्चेची बारावी फेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.