ETV Bharat / bharat

ICC World Cup 2023 BAN vs AFG : बांग्लादेशचा अफगाणिस्तानवर ६ गडी राखून विजय, शान्तो-मेहंदी हसनची अर्धशतकं - आयसीसी क्रिकेट विश्वचषक

ICC World Cup 2023 BAN vs AFG : विश्वचषक २०२३ मध्ये आज झालेल्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशनं अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्ताननं दिलेलं १५७ धावांचं लक्ष बांग्लादेशनं ३४.४ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

ICC ODI World Cup 2023 BAN vs AFG
ICC ODI World Cup 2023 BAN vs AFG
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 10:50 AM IST

Updated : Oct 7, 2023, 4:29 PM IST

र्मशाला ICC ODI World Cup 2023 BAN vs AFG : बांग्लादेशकडून नजमुल हुसैन शान्तो यानं ८३ चेंडूत सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तर मेहंदी हसन मिराजनं ७३ चेंडूत ५७ धावा केल्या. मेहंदी हसन मिराजला सामनावीर घोषित करण्यात आलं.

अफगाणिस्तानला अवघ्या १५६ धावांवर रोखलं : बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत, अफगाणिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. यानंतर अफगाणिस्तान संघानं सावध सुरुवात केली. त्यांची एकवेळ २० षटकांत २ बाद ९८ अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत अफगाणिस्तानला ३७.२ षटकांत अवघ्या १५६ धावांवर रोखलं. अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजनं सर्वाधिक ४७ धावा काढल्या. तर बांगलादेशकडून कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

दोन्ही संघात काटे की टक्कर : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या तिसऱ्या सामन्यात आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान आमनेसामने होते. धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियमवर हा सामना झाला. हे क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात सुंदर स्टेडियमपैकी एक मानलं जातं. अफगाणिस्ताननं या वर्षाच्या सुरुवातीला बांग्लादेशला मालिकेत २-१ नं पराभूत केलं होतं. मात्र बांग्लादेशनं आशिया चषक आणि विश्वचषकाच्या वॉर्मअप मॅचमध्ये अफगाणिस्तानचा पराभव केला होता. विशेष म्हणजे, बांग्लादेशनं २०१५ आणि २०१९ च्या विश्वचषकात आपला पहिला सामना जिंकला होता.

दोन्ही संघाची प्लेइंग ११ :

अफगाणिस्तान : रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

बांग्लादेश : लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, नजमुल हुसैन शान्तो, मेहंदी हसन मिराज, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : 'राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, तो प्रत्येक सामना गांभीर्यानं घेतो'; धोनीच्या बालपणीच्या मित्राची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत
  2. Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप २०२३ पूर्वी पाकिस्तानचे फक्त २ खेळाडू भारतात आले होते, जाणून घ्या त्यांची नावं
  3. Cricket World Cup 2023 : पाचवेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विजेतेपदाचा दावेदार, जाणून घ्या संघाची ताकद आणि कमजोरी

Last Updated : Oct 7, 2023, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.