ETV Bharat / bharat

ICC Cricket World Cup 2023 PAK vs NED : पाकिस्तानचा नेदरलॅंडवर दणदणीत विजय, भारतात प्रथमच विश्वचषक सामना जिंकला

ICC Cricket World Cup 2023 PAK vs NED : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलॅंडवर ८१ धावांनी धमाकेदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं ४९ षटकात सर्वबाद २८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलॅंडचा संघ ४१ षटकात २०५ धावाचं करू शकला.

ICC Cricket World Cup 2023 PAK vs NED
ICC Cricket World Cup 2023 PAK vs NED
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 2:23 PM IST

Updated : Oct 6, 2023, 9:45 PM IST

हैदराबाद ICC Cricket World Cup 2023 PAK vs NED : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं नेदरलॅंडचा ८१ धावांनी दणदणीत पराभव केला. पाकिस्ताननं दिलेल्या २८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलॅंडचा संघ ४१ षटकांत सर्वबाद २०५ धावाचं करू शकला. नेदरलॅंडकडून बास डी लीडनं सर्वाधिक ६८ चेंडूत ६७ धावा केल्या. तर विक्रमजीत सिंगनं ६७ चेंडूत ५२ धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफनं तीन बळी घेतले. ५२ चेंडूत ६८ धावा करणारा सौद शकील सामनावीर ठरला.

पाकिस्तानच्या सर्वबाद २८६ धावा : वर्ल्डकपच्या सलामीच्या लढतीत न्यूझीलंडनं गतविजेत्या इंग्लंडला नमवल्यानंतर आज दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानची लढत नेदरलँडशी झाली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात नेदरलँडच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर रिझवान आणि शकीलनं डाव सावरला. पाकिस्तानच्या ४९ षटकांत सर्वबाद २८६ धावा झाल्या.

बाबर आझम स्वस्तात परतला : सलामीवीर इमाम-उल-हक आणि फखर जमान दोघही स्वस्तात बाद झाले. फखरनं १५ चेंडूत १२ धावा केल्या. तर इमामनं १९ चेंडूत १५ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमही काही प्रभाव टाकू शकला नाही. बाबर आझम १८ चेंडूत ५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या मोहम्हद रिझवान आणि सौद शकीलनं पाकिस्तानचा डाव सावरला. दोघांनीही शानदार अर्धशतकीय खेळी केली. रिझवाननं ७५ चेंडूत ६८ धावा केल्या. तर सौद शकीलनं ५२ चेंडूत ६८ धावा ठोकल्या.

खेळपट्टी सीम बॉलर्सना मदत करणारी : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सीम बॉलर्सना मदत करणारी आहे. मात्र येथे फलंदाजांनाही उत्तम मदत मिळते. पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत ६ एकदिवसीय सामने झाले आहेत. पाकिस्ताननं हे सर्व सामने जिंकले. आजच्या सामन्यात पाकिस्तानची बाजू मजबूत असली तरी नेदरलँडही पारडं पलटवण्यास सक्षम आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग ११ :

पाकिस्तान : इमाम-उल-हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ

नेदरलँड : विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), बास डी लीड, तेजा निदामानुरु, साकिब झुल्फिकार, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 ENG vs NZ : न्यूझीलंडनं वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडला लोळवलं
  2. Cricket World Cup 2023 : तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात 'क्रिकेट विश्वचषक'चे सामने; कशी आहे तयारी? जाणून घ्या रोहित पवारांकडून

Last Updated : Oct 6, 2023, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.