नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनानिमित्त गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. एजन्सींच्या मते, दहशतवादी संघटना दिल्लीला हादरवण्याचा कट रचू शकतात. 15 ऑगस्ट रोजी आयबीने दिल्ली पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयबीच्या 10 पानी अहवालात इंटेलिजन्स ब्युरोने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, जैश या दहशतवादी कटाची योजना आखत असल्याची माहिती दिली आहे. आयएसआयची स्फोट घडवायची योजना आहे, असे 10 पानी अहवालात म्हटले आहे. यामध्ये अनेक नेत्यांसह बड्या संस्थांच्या इमारतींना लक्ष्य केले जाऊ शकते.
जपानच्या माजी पंतप्रधानांवर हल्ल्याचाही उल्लेख - आयबीच्या या अलर्टमध्ये जुलै महिन्यात जपानच्या माजी पंतप्रधानांवर हल्ला झाल्याचाही उल्लेख आहे. दिल्ली पोलिसांना १५ ऑगस्ट रोजी कार्यक्रमस्थळी प्रवेशाचे कडक नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उदयपूर आणि अमरावतीमधील घटनेचा संदर्भ देत गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे की, कट्टरपंथी गट आणि गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवली पाहिजे.
बीएसएफ देखील सतर्क - सीमा सुरक्षा दलांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. अहवालात असे म्हटले आहे की दहशतवादी संघटना एलईटी आणि जेएम हल्ल्यांसाठी यूएव्ही आणि पॅरा ग्लायडर वापरू शकतात. त्यामुळे बीएसएफला सीमेवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयबीने आपल्या अहवालात रोहिंग्या, अफगाण नागरिक राहत असलेल्या भागांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.