ETV Bharat / bharat

IAS Riya Dabi Marry With IPS : आयएएस टीना डाबीची बहीण रिया डाबीने केले कोर्ट मॅरेज, आयपीएस मनीष कुमारसोबत बांधली लग्नगाठ - जिल्हाधिकारी टीना डाबी

आयएएस रिया डाबीने महाराष्ट्र केडरचे आयपीएस मनीष कुमार यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. रिया ही जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबीची धाकटी बहीण आहे. लग्नानंतर आयपीएस मनीष कुमार यांची राजस्थान केडरमध्ये बदली करण्याचे आदेश आल्यानंतरच दोघांचे लग्न सार्वजनिक झाले आहे.

IAS Riya Dabi Marry With IPS
रिया डाबी आणि आयपीएस मनीष कुमार
author img

By

Published : Jun 19, 2023, 12:47 PM IST

जयपूर : जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांची धाकटी बहीण IAS रिया डाबी बोहल्यावर चढली आहे. रियाने महाराष्ट्र केडरचे आयपीएस मनीष कुमारशी लग्नगाठ बांधली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएस मनीष कुमार यांचे कॅडर महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये बदलल्यानंतर हे लग्न उजेडात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये केडर बदलण्याचे कारण राजस्थान कॅडरच्या आयएएस रिया डाबीसोबत लग्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोटिफिकेशन आणि दोघांचे एकत्र फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रिया डाबीचे अभिनंदन होत आहे.

IAS Riya Dabi Marry With IPS
आयएएस टीना डाबी आणि बहीण रिया डाबी

दोघेही 2021 बॅचचे अधिकारी : IAS रिया डाबी आणि IPS मनीष कुमार हे दोघेही UPSC 2021 बॅचचे आहेत. दोघांमध्ये आधी मैत्री होती, नंतर या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही याच वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले. घरच्यांच्या मान्यतेनंतर दोघांनी परस्पर संमतीने कोर्ट मॅरेज केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच विवाहाच्या आधारावर, नियमांनुसार मनीष कुमारने केडर बदलण्यासाठी अर्ज केला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाने तो अर्ज स्वीकारुन 16 जून रोजी केडर बदलाची अधिसूचना जारी केली.

IAS Riya Dabi Marry With IPS
आयएएस टीना डाबी आणि बहीण रिया डाबी

दोघी बहिणी आहेत आयएएस : रिया डाबी ही 2015 UPSC टॉपर टीना डाबीची धाकटी बहीण आहे. टीना डाबी या सध्या जैसलमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. रिया डाबी ही 2021 बॅचची IAS अधिकारी आहे. रिया सध्या अलवरमध्ये आपली सेवा बजावत आहे. दोन्ही बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. टीना डाबीच्या दुसऱ्या लग्नाचा पहिला फोटो रियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. आयएएस टीना डाबीचा पहिला विवाह 2015 बॅचचा दुसरा टॉपर अतहर आमिर खानसोबत 2018 साली प्रेमविवाह होता. मात्र दोघांचे लग्न दोन वर्षांहून अधिक काळ टिकले नाही. 2020 मध्ये जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात या दोघांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. यानंतर अतहर अमीर खान कॅडर बदलून जम्मू-काश्मीरला गेला आणि तिथे लग्न केले. त्याचवेळी टीना डाबीने राजस्थानच्या आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केले.

IAS Riya Dabi Marry With IPS
रिया डाबीने केले कोर्ट मॅरेज

हेही वाचा -

  1. आयएएस टॉपर टीना दाबीचा ग्लॅमरस लूक, सौंदर्यात कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.