ETV Bharat / bharat

IAS Condom Statement : तुम्ही उद्या कंडोम मागाल; सॅनिटरी पॅडची मागणी करणाऱ्या विद्यार्थीनीला IAS अधिकाऱ्याचे उत्तर - IAS gave wrong statement

हार महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ( Women and Child Development Corporation) बेजबाबदार वक्तव्य ( IAS Statement in Sashakt Betiyan Samridh Bihar ) केले आहे. ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम, जिन्स मागाल’, मग तेही सरकारने द्यावे का? असे एका मुलीने विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देतांना त्या म्हणाल्या..

IAS Statement in Sashakt Betiyan Samridh Bihar
सशक्त बेटियां समृद्ध बिहारमध्ये आयएएस विधान
author img

By

Published : Sep 29, 2022, 12:35 PM IST

पाटना : सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनींना बिहार महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ( Women and Child Development Corporation) बेजबाबदार वक्तव्य ( IAS Statement in Sashakt Betiyan Samridh Bihar ) केले आहे. ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम, जिन्स मागाल’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. महिला, बाल विकास महामंडळातर्फे राजधानी पाटणा येथे युनिसेफच्या मदतीने सशक्त कन्या, समृद्ध बिहार ( Strong Daughters Prosperity Bihar ) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत बिहार महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक हरजोत कौर बमरा ( Harjot Kaur Bamra ) आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

आयएएसने दिले असंवेदनशील उत्तर : कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थिनीने त्यांना प्रश्न विचारला होता की, सरकार सर्व काही देते तेव्हा शाळेला २०-३० रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? यावर हरजोत कौर बमहरा म्हणाल्या ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम, जिन्स मागाल’, असे असंवेदनशील उत्तर दिले. त्यामुळे कार्यक्रमात चांगलाच गोंधळ उडाला.

IAS अधिकाऱ्याचे असंवेदनशील वक्तव्य

"आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या जीन्स पॅन्ट मागाल. परवा तुम्ही सुंदर शूज सुद्धा मागाल आणि शेवटी कुटुंब नियोजनाचे साधन फुकट. सरकारकडून घेण्याची गरज का आहे, हा विचार चुकीचा आहे आणि स्वतः काहीतरी करा. -हरजोत कौर बमरा, डब्ल्यूसीडीसी एमडी

विद्यार्थिनीला पाकिस्तानात जाण्याचा दिला सल्ला : मिलर शाळेतील एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला की, शाळेतील मुलींची स्वच्छतागृहे तुटलेली असतात. मुले अनेकदा त्यात प्रवेश करतात.त्यामुळे आम्हाला कमी पाणी प्यावे लागते जणेकरुन वारंवार शौचालयात जाण्याची गरज पडणार नाही. यावर हरजोत कौर उत्तर देतांना म्हणाल्या की, तुमच्या घरात स्वतंत्र शौचालय आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे खूप काही मागितले तर ते कसे चालेल. सरकार मुलींना आर्थिक मदतही करत असून मुलींच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर एका मुलीने विचारले की, सरकार पैसे द्यायचे कारण ते आमच्याकडून मते घ्यायला येते, यावर हरजोत कौर म्हणाल्या की, खूप मूर्खपणा आहे, तुम्ही पैशाच्या बदल्यात मतदान करता, पाकिस्तानात जा. यावर विद्यार्थ्याने सांगितले की, मी हिंदुस्थानी आहे, मी पाकिस्तानात का जाऊ?

मासिक पाळीतील स्वच्छता महत्त्वाची : मुलींच्या आरोग्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असली पाहिजेत. मासिक पाळीदरम्यान त्यांना चांगल्या दर्जाचे सॅनिटरी पॅड मिळणे आवश्यक आहे. यावेळी घाणेरडे कपडे वापरल्याने अनेक प्रकारचे संसर्ग शरीरात पसरतात. NFHS 5 च्या अहवालात देखील म्हटले आहे की, बिहारमधील गरीब, मागासलेल्या वस्त्यांमधील महिलांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेची स्थिती अत्यंत खराब आहे. ज्यामुळे महिला अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोगांना तोंड द्यावे लागते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.