ETV Bharat / bharat

Shiv Sena Press Conference : 'सौ सुनार की एक लोहार की', राऊतांनी सोडला बाण; आज पत्रकार परिषद - आज शिवसेनेची पत्रकार परिषद कुठ होणार

सौ सुनार की एक लोहार की असे म्हण राऊतांनी बाण सोडला आहे. आज दुपारी 4 वा होणाऱ्या पत्रकार परिषदेबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत काही दिवसांत चांगलेच आक्रमक झाले आहेत. आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. (Shiv Sena Press Conference Today ) मात्र, त्यांना सांगतो आता माजी गृहमंंत्री अनिल देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये असतील अस राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, आज मंगळवार (दि. 15)रोजी दुपारी 4 वाजता शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत.

शिवसेना v भाजप
शिवसेना v भाजप
author img

By

Published : Feb 15, 2022, 7:13 AM IST

Updated : Feb 15, 2022, 11:07 AM IST

मुंबई - आम्ही खूप सहन केले. हे आता आती होत आहे. आता बघाच, काय होतय ते असा निर्वाणीचा इशारा इशारा देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. (Shiv Sena Press Conference ) आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. मात्र, त्यांना सांगतो आता (Former Home Minister Anil Deshmukh) माजी गृहमंंत्री अनिल देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये असतील असही राऊत यावेळी म्हणाले आहेत. (SANJAY RAUT On BJP) दरम्यान, आज मंगळवार (दि. 15)रोजी दुपारी 4 वाजता शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत.

ही नाव रडारवर

सगळ्याच बाजूने वातावरण तापलेले असताना शिवसेनेचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील 'फक्त टॉस झाला आहे' असे सुचक विधान केले आहे. (Sanjay Raut will speak on BJP) त्यामुळे या साडेतीन नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसार लाड, राणे आणि किरीट सोमैया ही नावे शिवसेनेच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा

राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना सहभागी झाल्यानंतर भाजपने सेनेवर आगपाखड करायला सुरुवात केली. शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. (Press conference at Shiv Sena Bhavan) दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमैयांकडून आघाडीतील नेत्यांवर कथीत भ्रष्टाचाराचे आरोप सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेची मुस्कटदाबी करण्यासाठी सेना आमदारांसह आघाडीतील अनेक नेते रडारवर आहेत. (Sanjay Raut will hold a press conference) खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर ईडीकडून फुलेवाल्यांसह इतरांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. (Prasad Lad) केंद्र आणि भाजपकडून टार्गेट केले असल्याचे लेखी पत्र उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांना संजय राऊत यांनी दिले आहे.

अभी तो टॉस हुआ है

राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना, तुम्ही बघाच. "आजपर्यंत आम्ही खूप सहन केले, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत", "डोक्यावरुन आता खूप पाणी गेल आहे? असे सांगत भाजपच्या साडेतीन नेत्यांचा भांडाफोड करण्याचा इशारा दिला. तर दुसरीकडे नागपूर येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'सामना अजून सुरु व्हायचा आहे. अभी तो टॉस हुवा है' असे विधान केले. शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे भाजप गोटात खळबळ उडाली आहे. तर कोणत्या नेत्यांना शिवसेना लक्ष करणार? याकडे सर्वांची लागले आहे.

फडणवीस टार्गेटवर?

राजकीय विश्लेषकांच्या (Devendra Fadnavis) मते, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, किरीट सोमय्या किंवा त्यांचा मुलगा नील सोमैया आणि नारायण राणे यांचे सुपूत्र रडारवर असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणामुळे फडणवीस गोत्यात?

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सन (2014)च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम टप्प्यात आले आहे. (Kirit Somaiya) एककीडे राज्यमंत्री बच्चू कडू यांना माहिती लपवल्या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. आता फडणवीस यांचे प्रकरण देखील त्याच स्वरुपाचे आहे. न्यायालयाच्या निकालावर ते गोत्यात येण्याची शक्यता आहे. थेट फडणवीसांना लक्ष केल्यास भाजपला चपराक बसेल, असे भाकीत वर्तवले जात आहे.

मुंबै बॅंक गैरव्यवहार

मुंबै बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी सहकार विभागाने ऑडिट केले. (Narayan Rane,) बँकेच्या विविध शाखांमधील व्यवहारात तफावत आढळून आली. भाजपचे आमदार तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या काळातील हे प्रकरण आहे. मंजूर म्हणवून घेत, आजपर्यंत निवडणुका लढवल्या. अनेक सुविधांचा फायदा घेतला. औद्योगिक न्यायालयाच्या कोर्टात प्रकरण प्रलंबित आहेत. हा मुद्दा तापवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शंभर कोंटीच्या अफरातफरीचा आरोप

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी (2009)साली मुंबई महानगर पालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. (2014)मध्ये या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. सुमारे शंभर कोटींचा हा घोटाळा असल्याने या प्रकरणी लाड यांचा नंबर लागण्याची शक्यता आहे.

खंडणी प्रकरण भोवणार

किरीट सोमैया यांच्याकडून सातत्याने राज्यातील महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येत आहे. शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मात्र, सोमैया यांनी अर्थ एनजीओ आणि त्याचे संस्थापक प्रवीण कलमे यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. तर दुसरीकडे सोमैयांचा मुलगा नील सोमैया यांची खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात चौकशी सुरु आहे. या चौकशीला धार दिली जाण्याची शक्यता आहे.

राणे रडारवर

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे कोर्टापुढे शरण आल्यानंतर कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला होता. कोर्टातून राणे निघाल्यानंतर पोलीसांनी त्यांची गाडी अडवली. नितेश आणि निलेश राणे यांनी पोलीसांसोबत बाचाबाची केली. पोलिसांनी राणेंनी अर्वोच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करत शिवसेनेने कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण शिवसेना पुन्हा उकरुन काढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : हम डरेंगे नहीं! संजय राऊत आक्रमक, उद्या घेणार पत्रकार परिषद

Last Updated : Feb 15, 2022, 11:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.