मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री एक खळबळजनक घटना उघडकीस आली. येथे भांडणानंतर पतीने पत्नीला मिठी मारून तिच्या पाठीवर गोळी झाडली. ही गोळी दोघांच्या शरीरातून आरपार गेली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, आत्तापर्यंत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. पती चंदीगड येथे मजुरीचं काम करायचा.
मिठी मारून पत्नीच्या पाठीत गोळी झाडली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी पोलीस स्टेशन हद्दीतील खानपूर गावात अनिक पाल पत्नी सुमन आणि चार मुलांसोबत राहत होता. तो चंदीगडमध्ये राहून मजुरीचं काम करायचा. बिलारी खानपूर या त्याच्या गावी आल्यानंतर अनिक पाल आणि त्याची पत्नी सुमन यांच्यात अनेकदा भांडण होत असे. मंगळवारी रात्री उशिरा पती - पत्नीमध्ये पुन्हा भांडण झाले. थोड्या वेळाने अनिक पाल त्याच्या पत्नीकडे आला आणि तिला मिठी मारली. पत्नीला मिठी मारल्यानंतर अनिक पाल याने पत्नीच्या पाठीत गोळी झाडली. गोळी दोघांची छाती फाडून बाहेर आली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
पती पत्नीची गोळी लागून मृत्यू झाल्याची बातमी मिळाली होती. दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. मृत अनिक पालने पत्नीला मिठी मारली आणि तिच्या पाठीत गोळी झाडली. गोळी लागून दोघांचाही मृत्यू झाला. - संदीप कुमार मीणा, एसपी
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल : गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. आई-वडील यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वारंवार भांडणे होत असल्याचे मृताच्या मुलांनी सांगितले. रात्रीही दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर गोळी झाडली गेली.
हेही वाचा :