नई दिल्ली : राजधानी दिल्लीतील बुरारी मैदानावर आज देशातील सर्वात मोठा मानवी तिरंगा बनवण्याचा कार्यक्रम होता, तो पुढे ढकलण्यात आला आहे. दुपारी बाराच्या सुमारास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालहेही ( Chief Minister Arvind Kejriwal ) या कार्यक्रमाला पोहोचणार होते. त्यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांकडून मानवी तिरंगा ( human tricolor ) साकारला जाणार होता. जो देशातील सर्वात मोठा मानवी तिरंगा ठरला असता. बुरारी मैदानावर ( Burari Maidan Delhi ) 52 हजार शाळकरी मुले मानवी तिरंगा बनवणार होते. मात्र, पावसाचे पाणी संपूर्ण मैदानात भरल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून दिली.
-
आज़ादी की 75वीं वर्षगाँठ के अवसर पर दिल्ली के बच्चे आज सबसे बड़ा तिरंगा बनाने वाले थे. लेकिन बुराड़ी मैदान में बारिश का पानी भरने के कारण यह कार्यक्रम फ़िलहाल स्थगित किया जा रहा है.
— Manish Sisodia (@msisodia) August 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
कल हमारे बच्चों ने इसका शानदार रिहर्सल भी किया था. pic.twitter.com/VvbUlLHccX
">आज़ादी की 75वीं वर्षगाँठ के अवसर पर दिल्ली के बच्चे आज सबसे बड़ा तिरंगा बनाने वाले थे. लेकिन बुराड़ी मैदान में बारिश का पानी भरने के कारण यह कार्यक्रम फ़िलहाल स्थगित किया जा रहा है.
— Manish Sisodia (@msisodia) August 4, 2022
कल हमारे बच्चों ने इसका शानदार रिहर्सल भी किया था. pic.twitter.com/VvbUlLHccXआज़ादी की 75वीं वर्षगाँठ के अवसर पर दिल्ली के बच्चे आज सबसे बड़ा तिरंगा बनाने वाले थे. लेकिन बुराड़ी मैदान में बारिश का पानी भरने के कारण यह कार्यक्रम फ़िलहाल स्थगित किया जा रहा है.
— Manish Sisodia (@msisodia) August 4, 2022
कल हमारे बच्चों ने इसका शानदार रिहर्सल भी किया था. pic.twitter.com/VvbUlLHccX
दिल्लीत जोरदार पाऊस - बुरारी मैदानात पावसाचे पाणी तुंबल्याने हा कार्यक्रम काही काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. काल रिहर्सल होणार होती, त्यादरम्यान जोरदार पाऊस झाला. कालची रिहर्सलही पावसामुळे रद्द करावी लागली. बुरारी मैदानावर पोहोचलेल्या शाळकरी मुलांना बसमध्ये बसवून शाळेत पाठवण्यात आले.
कार्यक्रम रद्द - सुमारे 22 हजार शाळकरी मुले बुरारी मैदानावर पोहोचली होती. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. आज मानवी तिरंगा बनवण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता, तो पावसाच्या पाण्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आता दिल्ली सरकार येत्या काही दिवसांत हा कार्यक्रम करते की नाही हे पाहावे लागेल. अन्यथा हा कार्यक्रम पूर्णपणे रद्द केला जाईल. मात्र, सध्या बुरारीचे मैदान पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले आहे.
हेही वाचा - Cabinet Expansion Of Shinde Govt: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; वाचा संभाव्य मंत्रिमंडळाची यादी