नवी दिल्ली : गाझियाबादच्या लोणी भागातील अमन गार्डन कॉलनीमध्ये ( Aman Garden Colony ) बुधवारी सकाळी १० वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट ( Cylinder blast in Ghaziabad ) झाल्याने दोन मजली घर कोसळले. घरात उपस्थित महिला आणि लहान मुले ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
पोलीस घटनास्थळी दाखल : माहिती मिळताच लोणी पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक ( Team of Loni Police and Fire Department ) घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमानंतर 5 जणांना जखमी अवस्थेत घरातून बाहेर काढण्यात आले. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. त्याचवेळी घरात आणखी काही लोक दबले जाण्याची शक्यता आहे. घटनास्थळी लोणीचे मंडळ अधिकारी रजनीश कुमार उपाध्याय, लोणीचे एसडीएम संतोष कुमार राय अग्निशमन अधिकारी सुनील कुमार सिंह मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी उपस्थित आहेत. तर बचावकार्य सुरूच आहे.