ETV Bharat / bharat

Horror Killing In Meerut : हॉरर किलिंग; प्रेमात पडलेल्या मुलीच्या खुनाची वडिलांनीच दिली सुपारी - Father Gives Contract To Kill Daughter

मेरठमध्ये हॉरर किलिंगची घटना ( Horror Killing In Meerut ) समोर आली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या हत्येसाठी 1 लाखांची सुपारी ( Father Gives Contract To Kill Daughter ) दिली. संतापलेल्या पित्याने मुलीच्या हत्येचा फिल्मी स्टाईल कट रचला. हॉस्पिटलच्या बाहेरच्या कंपाउंडरने फिल्मी स्टाईलमध्ये हॉस्पिटलमध्ये घुसून आणि अल्पवयीन मुलीला विषाचे इंजेक्शन दिले अन् तेथून तो पळून गेला. सुदैवाने मुलीचे प्राण वाचले.

Horror Killing In Meerut
Horror Killing In Meerut
author img

By

Published : Aug 7, 2022, 1:01 PM IST

Updated : Aug 7, 2022, 2:17 PM IST

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातून हॉरर किलिंगची ( Horror Killing In Meerut ) खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे संतापलेल्या वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या हत्येसाठी 1 लाखांची सुपारी दिली ( Father Gives Contract To Kill Daughter ). संतापलेल्या वडिलांनी फिल्मी स्टाईलमध्ये कट रचला हे विशेष. बाहेरील कंपाउंडर फिल्मी स्टाईलमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि अल्पवयीन मुलीला विषाचे इंजेक्शन देऊन तेथून पळून जातो, अशी घटना चित्रपटात दाखविली जाते. अगदी तसेच या घटनेत घडले आहे. मात्र, सुदैवाने डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे या अल्पवयीन मुलीचे प्राण वाचले आहेत. या संपूर्ण घटनेत सहभागी असलेले वडील, कंपाउंडर आणि स्टाफ नर्स यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले.

मेरठच्या कंकरखेडा येथील शिवलोकपुरी येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीला शुक्रवारी रात्री उशिरा कैलाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किशोरवयीन मुलगी कपडे काढण्यासाठी टेरेसवर गेल्याचे सांगण्यात आले. तेवढ्यात माकडांनी तिला घेरले. त्यानंतर माकडांच्या भीतीने तिने छतावरून उडी मारल्याने ती जखमी झाली. त्यामुळे जखमी मुलीला त्यांनी कैलाशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर मुलीला पल्लवपुरम येथील फ्युचर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे एक बाहेरील कंपाउंडर फिल्मी पद्धतीने आला आणि त्याने पोटॅशियम क्लोराईडचे इंजेक्शन अल्पवयीन मुलीला दिले अन् तो पळून गेला.

मुलीची प्रकृती बिघडली तेव्हा काहीतरी गडबड असल्याचा संशय डॉक्टरांना आला. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण डॉक्टरांच्या ड्रेसमध्ये आयसीयूमध्ये पोहोचला आणि काही वेळातच निघून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा तरुण दुसऱ्या रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करतो, असे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी कंपाउंडर रमेशला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी रमेशने सांगितले की, त्याच्या वडिलांनी किशोरला मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती.

कटाचा खुलासा - अल्पवयीन मुलीच्या आरोपी वडिलांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, त्यांच्या मुलीचे एका जिम ऑपरेटरसोबत प्रेमसंबंध आहेत. यामुळे संतापलेल्या वडिलांनी आपल्याच मुलीच्या हत्येचा कट रचला. मात्र डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ही अल्पवयीन मुलीचे प्राण वाचले. सध्या पल्लवपुरम पोलिसांनी या प्रकरणातील संपूर्ण कटात सहभागी आरोपी वडील, कंपाउंडर आणि स्टाफ नर्स यांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. त्यांच्याकडून रिकामी सिरिंज, इंजेक्शन आणि ९० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा - Suicide of Indian woman in New York : न्यूयाॅर्क शहरात भारतीय महिलेची आत्महत्या; मृत्यूपूर्वी छळाची व्हिडिओमधून दिली माहिती

Last Updated : Aug 7, 2022, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.