मेष - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार - विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार - विमर्श कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आई व स्त्री वर्गाकडून लाभ संभवतो. कामाचा व्याप वाढल्याने अस्वस्थ राहाल.
वृषभ - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील.
मिथुन - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृती चांगली राहणार नाही. दिलासा मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील.
कर्क - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.
सिंह - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील व लाभ सुद्धा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
कन्या - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद - विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रणयाराधनेत यशस्वी व्हाल. शेअर - सट्टा ह्या पासून सावध राहा.
तूळ - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. जमीन विषयक व्यवहार अतिशय जपून करा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.
वृश्चिक - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. जीवनात काही लाभदायक बदल होतील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. आपली लोकप्रियता वाढेल.
धनू - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्वाचा निर्णय घेऊच नका. नाहक खर्च व अकारण व्यवहार मनाला व्यथित करतील.
मकर - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील. वैवाहिक जीवनात सुख व समाधान लाभेल.
कुंभ - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. वाणी व राग ह्यावर संयम ठेवावा लागेल. एखादा अपघात संभवतो.
मीन - आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. एखादी आनंददायी बातमी समजेल. पत्नी व संतती कडून लाभ होईल. अचानक धनप्राप्ती संभवत आहे. नवीन व महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.