मेष - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील. कामा निमित्त किंवा काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. लेखनकार्य करण्यास दिवस अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार विनिमय होईल. कोणत्याही स्त्रीशी वाद घालू नका.
वृषभ - आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. लेखक, कलाकार तथा सल्लागार ह्यांच्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवे काम आरंभ करण्यात अडचणी येतील.
मिथुन -आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. प्रकृती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ न देणे हितावह राहील.
कर्क - आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत. एखादी समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादा अपघात संभवतो. कोणतेही कृत्य विचार पूर्वकच करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चात वाढ होईल.
सिंह - आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह राहील. विचार करण्यात खूप वेळ जाईल. आर्थिक लाभ संभवतात.
कन्या -आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. सरकारी कामे पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.
तूळ - व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य व बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य राहील.
वृश्चिक - आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकार विरोधी प्रवृतीं पासून दूर राहणे हितावह राहील. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाची सुद्धा शक्यता आहे.
धनू - आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमालाप करू शकाल. लेखन कार्यास आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक विचारांची देवाण घेवाण होईल. भागीदारीत फायदा होईल. नावलौलिक होऊ शकेल. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल.
मकर - आजचा दिवस व्यापार - व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. योग्य ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापार्यांना कायदेशीर त्रास संभवतो. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ - आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. लेखन व नवनिर्माण ह्या कामासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक खर्च उदभवतील. पोटाचे विकार संभवतात.
मीन - आजचा दिवस मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. पैसा व कीर्ती ह्यांची हानी संभवते. नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादींशी संबंधित दस्तावेजात काळजी घ्यावी.