मेष - आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार-विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्ला-मसलात कराल. गृहसजावटीचे आयोजन कराल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.
वृषभ - आज विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. व्यापार्यांना व्यापारात धनलाभ होईल. नवे बेत हाती घ्याल. दूरचे प्रवास होतील. एखाद्या विषयात प्रगती होईल. संततीची प्रगती होईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मिथुन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या - पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कर्क - समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्ती ह्यामुळे आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान - प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
सिंह - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येईल. आई विषयक चिंता राहील.
कन्या - आज शक्यतो वाद व चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करताना सावध राहावे.
तूळ - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. जवळच्या नातलगांशी संघर्ष किंवा वाद झाल्याने मनाला यातना होतील.
वृश्चिक - नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांशी घराविषयी महत्वाची चर्चा कराल. आर्थिक लाभ संभवतात. नशिबाची साथ लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. मित्रांच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. कामात यश मिळेल.
धनू - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल. अकारण खर्च वाढतील.
मकर - आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा. मित्र परिवार व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने मानसिक शांती लाभेल.
कुंभ - आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. कोणाचे भले करण्याच्या नादात आपण संकटात पडणार नाही याची काळजी घ्या. दुर्घटनेपासून जपा.
मीन - आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे.