24 सप्टेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज नोकरीत वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - horoscope for the day 24 september
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

मेष - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह आनंदात व उत्साहात वेळ जाईल. मातेकडून लाभ संभवतात. मित्र व संबंधितांमुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. कुटुंबीयांचा विरोध व रुसवा ह्यास सामोरे जावे लागेल. आज सुरू केलेले काम अपूर्ण राहील. एखादा अपघात संभवतो.
मिथुन - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबियां कडून सुद्धा काही लाभ संभवतो. स्वादिष्ट भोजन प्राप्ती होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल.
कर्क - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मान - प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. स्वास्थ्य उत्तम राहील. सरकारी कामात अनुकूलता लाभेल.
सिंह - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी - व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यामुळे मनाची अशांती दूर होईल.
कन्या - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशया पासून दूर राहा. खर्च खूप होईल. गूढ विद्या व रहस्य ह्यांची गोडी लागेल.
तूळ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपणास खूप आनंद होईल. सार्वजनिक मान - सन्मान प्राप्त होईल.
वृश्चिक - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल. अपूर्ण कामे तडीस जातील. आर्थिक लाभामुळे खर्च आपला ताण वाढविणार नाही.
धनू - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. संततीची काळजी वाटेल. प्रेमीजनांना प्रेमालापासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. धनप्राप्ती होईल.
मकर - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. पुरेशी विश्रांती व झोप न मिळाल्याने आरोग्य बिघडेल. उत्साह व स्फूर्ती राहणार नाही. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे.
कुंभ - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. स्नेहीजन घरी आल्याने आनंद वाटेल. प्रवासाची शक्यता आहे.
मीन - आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण - घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खाण्या - पिण्याच्या बेपर्वाहीमुळे आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे.