मेष - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. दूरवर राहणार्या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील.
वृषभ - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकार कडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल. वरिष्ठ अधिकार्यांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला उत्साह वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. दांपत्य जीवनात गोडी वाटेल. सरकार कडून लाभ मिळतील.
मिथुन - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. शरीरास थकवा व आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. नोकरी - व्यवसायात सुद्धा प्रतिकूल वातावरण असेल. वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. खर्चात वाढ होईल. महत्वाच्या कामातील कोणताही निर्णय आज घेऊ नये.
कर्क - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अवैध कामां पासून शक्य तितके दूर राहावे.
सिंह - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे. कोर्ट- कचेरीच्या कामात फारसे यश मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रात यश मिळणार नाही.
कन्या - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. कार्यात यशस्वी व्हाल. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होईल.
तूळ - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत.
वृश्चिक - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे दस्तावेज काळजीपूर्वक करावेत.
धनू - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल. आप्तेष्ट व मित्रांच्या आगमनामुळे आपणाला आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. नशिबाची साथ लाभेल.
मकर - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल. डोळ्यांचा त्रास संभवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे.
कुंभ - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. मिळालेच्या भेट वस्तूंमुळे आनंदी राहाल. आपल्या मनास स्पर्श करणारे विचार ऐकिवात येतील.
मीन - आज चंद्र रास बदलून कुंभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. मांगलिक कार्यावर पैसा खर्च होईल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.