मेष - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाणीत सुद्धा सावध राहावे लागेल. मनाच्या उदासीनतेमुळे नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे.
वृषभ - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपार नंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रां कडून लाभ होईल. स्वकीयांशी संपर्क वाढून त्यांच्याशी संबंध सुधारतील. संतती कडून एखादा लाभ संभवतो. नवीन परिचयामुळे मन आनंदित होईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्यासह सहलीला जाण्याचा बेत आखाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
कर्क - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.
सिंह - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.
कन्या - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपार नंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. गूढ विद्येची आवड निर्माण होईल.
तूळ - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपार नंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शक्यतो प्रवास टाळावेत.
वृश्चिक - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकाल. वाहनसौख्य लाभेल.
धनू - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आर्थिक लाभ झाल्याने भविष्यासाठी काही तरतूद कराल. आपल्या हातून एखादे सत्कार्य घडेल.
मकर - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत.
कुंभ - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळे आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणे हितावह राहील.
मीन - आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल.