मेष - आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक गोष्टीत उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टया आनंदात राहाल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन - आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद - विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. मानहानी संभवते. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी त्रास देतील. नव्या कार्याचा आरंभ करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो.
कर्क - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. एखादी मानहानी संभवते.
सिंह - आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य स्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवू शकाल. मानसिक चिंता दूर होतील. कार्यात यशस्वी व्हाल.
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील. स्वादिष्ट बोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आयात - निर्यात संबंधित व्यापारात यश प्राप्ती होईल.
तूळ - आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष व मनोरंजनावर पैसा खर्च कराल.
वृश्चिक - आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सांभाळून काम करणे उचित ठरेल.
धनू - आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होऊन लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मंगलकार्ये होतील. उत्तम भोजनाचा आस्वाद मिळेल.
मकर - आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होतील.
कुंभ - आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. मौज - मजेसाठी जास्त खर्च कराल. एखादा प्रवास संभवतो. परदेशगमनाची शक्यता वाढेल. तसेच परदेशातून आनंददायी बातम्या मिळतील. संततीची काळजी लागून राहील.
मीन - आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अचानक धनलाभ होऊन आपल्या मनावरील भार काही अंशी हलका होईल. व्यापार्यांची जुनी येणी वसूल होतील.
हेही वाचा - साप्ताहिक राशीभविष्य : मिथून राशीसाठी हा आठवडा मध्यम फलदायी; जाणून घ्या बाकी राशींचे भविष्य