ETV Bharat / bharat

11 ऑगस्ट राशीभविष्य : आज 'या' राशीवाल्यांनी आपल्या आरोग्य विषयक तक्रारी येणार; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य

राशीभविष्य
राशीभविष्य
author img

By

Published : Aug 11, 2021, 12:00 AM IST

Updated : Aug 11, 2021, 6:28 AM IST

मेष - आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. दैनंदिन कार्यात मात्र काही अडचणी निर्माण होतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परिश्रमाचे अपेक्षित यश मिळू शकणार नाही.

वृषभ - आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे परोपकारी कार्य घडेल.

मिथुन - आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. भोजनाची वेळ पाळू शकणार नाही. आज आपण अधिक हळवे व्हाल. घरातील वातावरण प्रतिकूल राहील. जमीन वा इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. जास्त भावनाशील होऊ नका.

कर्क - आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपार नंतर सहलीचा बेत ठरवू शकाल. सहकार्यांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. प्रकृती उत्तम राहील. मनाच्या प्रसन्नतेमुळे दिवसाचा आनंद वाढेल.

सिंह - आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. दूर राहणारे स्वकीय व मित्र यांच्याशी खूप कालावधी नंतर होणारा एखादा व्यवहार आज आनंददायी व लाभदायी ठरेल.

कन्या - भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. दुपार नंतर वडील व वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनातील चिंता कमी होईल व मन आनंदी बनेल. आरोग्याच्या बाबतीत असमाधानच राहील.

तूळ - आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. दुपार नंतर मात्र हळुवारपणा वाढल्याने मन व्यग्र बनेल. काळजीमुळे मनस्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडेल. उक्ती आणि कृती यांत संयम बाळगा. खर्च वाढेल.

वृश्चिक - आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील. दुपार नंतर मित्रांकडून लाभ होईल. दिवसभर वैचारिक पातळीवर अनिश्चिततेचे मळभ राहील. त्यामुळे अंतिम निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. असे निर्णय शक्यतो दुपार नंतर घेऊ नये.

धनू - आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. कार्य सफल होईल. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी अनुकूल आहे. पित्याकडून लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल.

मकर - आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका. निरर्थक वाद-विवाद व चर्चा यापासून दूर राहा.

कुंभ - आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतो. खूप परिश्रम करुनही अपेक्षित प्राप्ती होणार नाही.

मीन - आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळणे अवघड होईल.

Last Updated : Aug 11, 2021, 6:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.