मेष : 12 जुलै, 2023 बुधवारीच्या दिवशी चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरूवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.
वृषभ : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने आपले मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे.
मिथुन : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रां कडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पत्नी व संतती ह्यांच्याशी सुसंवाद राहिल्याने दांपत्य जीवनात गोडवा निर्माण होईल.
कर्क : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख - शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामे शांतपणे व व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.
सिंह : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज स्वभावात उग्रता व संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. उतावीळपणामुळे निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायात अडचणी आल्याने नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल.
कन्या : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रू पासून सावध राहा. आग व पाणी या पासून जपून राहावे. सरकार विरोधातील काम किंवा अवैध प्रवृत्ती ह्यामुळे संकट ओढवेल.
तूळ : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन व मौज - मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश व कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील. उंची वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दांपत्यसुख व वाहनसुख मिळेल. प्रकृती व मनःस्वास्थ्य उत्तम राहील. मित्रांसह सहलीला जाल.
वृश्चिक : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल. अपूर्ण कामे तडीस जातील. आर्थिक लाभामुळे खर्च आपला ताण वाढविणार नाही.
धनू : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य, लेखन व कला ह्या विषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आज वाद - विवाद किंवा चर्चा ह्यात भाग घेऊ नका.
मकर : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. छातीत दुखणे संभवते. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येऊ शकता.
कुंभ : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण तना - मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्र व स्वजनांच्या सहवासाने आपले मन आनंदीत होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य पूर्वक उत्तम यश मिळवाल.
मीन : चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा आपण चांगले टिकवून ठेवाल.