उत्तर प्रदेश : यमुना एक्स्प्रेस वेच्या सर्व्हिस रोडवरील कृषी संशोधन केंद्राजवळ लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये ( Body In Suitcase ) रक्ताने भिजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह दिल्लीतील मोडबंद गावातील नितेश यादव यांची मुलगी आयुषी यादव (21) हिचा आहे. रात्री उशिरा पोलिसांच्या चौकशीत केली असता वडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलीचा गोळ्या घालून खून केल्याचे मान्य केले आहे.( Father Threw Daughters Body In Suitcase After Murder )
आयुषी घरी परतताच वडिलांनी केली हत्या : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी मुलगी आयुषीची हत्या केल्याचे मान्य केले आहे. आरोपी वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी आयुषी आपल्याला न सांगता घरातून निघून गेली होती. याचा त्यांना राग आला. आयुषी घरी परतताच तिच्या वडिलांनी तिच्यावर हल्ला करून तिची हत्या केली. ही बाब आरोपी वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत मान्य केली आहे. नितेश यादव यांच्या म्हणण्यानुसार, रागाच्या भरात त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी मुलगी आयुषीचा मृतदेह रात्रीच एका सुटकेसमध्ये ठेवला आणि नंतर झुडपात फेकून दिला. यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांना अटक केले आहे.
मुलीच्या लागली छातीत गोळी : तरुणीने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि हाफ पँट घातली होती. कपड्यांवरून ती चांगल्या कुटुंबातली आहे असे वाटत होते. मुलीची उंची सुमारे 5 फूट 2 इंच होती. रंग गोरा, काळे आणि लांब केस होते. तिने राखाडी रंगाचा हाफ-स्लीव्ह टी-शर्ट घातला होता, त्यावर लेडी डेज लिहिले होते. निळ्या आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातली होती. डाव्या हातात कलवा आणि काळा दोराही बांधला होता. पायात हिरवी नेलपॉलिश होती. याशिवाय मुलीच्या छातीत गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या.
शुक्रवारी मृतदेह सापडला : मथुरेतील थाना राया भागातील वृंदावन कट आणि राया कट दरम्यान यमुना एक्स्प्रेस वेच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी दुपारी लाल रंगाच्या ट्रॉली बॅग सूटकेसमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता . मृतदेह प्रथम पॉलिथिनमध्ये पॅक करून नंतर हात-पाय बांधून सुटकेसमध्ये बंद केले. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता.